Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाच - रिंकू राजगुरू !

 वारी आणि माझं नात अजून घट्ट झाल - रिंकू राजगुरू !

पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाच - रिंकू राजगुरू !




पाऊस आला की विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध हे सगळ्यांना लागतात आणि अश्यातच अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाची वारी अजून खास करण्यासाठी सज्ज होताना दिसते.काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारी मधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचा चर्चांना उधाण आल होत आणि आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकूचा एक नवा अंदाज अनुभवायला मिळणार आहे. सारेगम मराठीने सोशल मीडियावर गाण्याची एक छोटी झलक दाखवली आणि आता सगळेच या गाण्यासाठी उत्सुक आहेत. 


“बाप विठुराया” अस या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाण बघायला मिळणार आहे. अजय यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा बाप विठुराया गाण्यातून अनुभवायला मिळणार आहे.


गाण्याबद्दल बोलताना रिंकू सांगते “मला खुप आनंद होतोय की की माझं पहिलं अल्बम गाण हे विठ्ठलावर चित्रीत आहे कारण माझं आणि विठ्ठलाच नातं खुप अगोदर पासुनच आहे.माझं विठ्ठलावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत असतो मी त्याच्या सोबत खूप गप्पा ही मारते विठ्ठल हा माझ्या आयुष्यातल्या एक हळवा भाग आहे.त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलं कारण आजवर मी कधीच अल्बम song केलं नाही कारण माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायल आहे आणि फार वर्षांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करता आलं.सारेगम सोबत ही काम करता आलं याचाही मला खुप आनंद आहे.माझं पहिलं अल्बम song असल्याने हे माझ्यासाठी खुप खास आणि जवळच आहे. आणि आशा करते की प्रेक्षकांना ही ते तितकंच आवडेल”




रिंकूचा कधीही न पाहिलेला वेगळा पण तितकाच लक्षवेधी लुक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला तर मिळणार आहे पण पहिल्या वहिल्या अल्बम गाण्यासाठी रिंकू देखील तितकीच उत्सुक असल्याचं कळतंय. ११ जुलैला म्हणजे आज “ बाप विठुराया” हे गाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.