2024 च्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'आर्टिकल 370'ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार
'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यन आणि 'भ्रमयुगम'साठी मामुटी यांना प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
'आर्टिकल 370'साठी यामी गौतमला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी रणदीप हुड्डाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पदार्पण
'भंगार'ने पटकावला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म पुरस्कार; 'राम-नामी'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार
ब्लॉकबस्टर 'कल्की 2898 एडी', 'पुष्पा: द रूल – पार्ट 2', 'स्त्री 2' आणि 'आमरण'चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दबदबा
2024 वर्षासाठीच्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची आज घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट, नॉन-फीचर चित्रपट आणि चित्रपटविषयवक लेखन या विभागांतील भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
'आर्टिकल 370' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला तर 'भंगार'ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म आणि 'राम-नामी'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला.
'आर्टिकल 370' साठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर मामूटी ('ब्रह्मयुगम') आणि कार्तिक आर्यन ('चंदू चॅम्पियन') यांना सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला.
रणदीप हुडाला 'स्वातंत्र्य वीर सावरकर'साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार मिळाला तर 'कल्की 2898 एडी', 'आमरण', 'पुष्पा: द रूल पार्ट-02', 'भूल भुलैया 3', 'स्त्री 2' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनीही मोठे सन्मान पटकावले, जे भारतीय चित्रपटसृष्टीची विविधता आणि उत्कृष्टता दर्शवतात.
फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष जयराज, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष असीम सिन्हा, सर्वोत्कृष्ट चित्रपट लेखन ज्युरीचे अध्यक्ष ए. चंद्रशेखर यांनी पत्र सूचना कार्यालयाचे (पीआयबी) सहसचिव (चित्रपट) डॉ. अजय नागभूषण एम.एन. आणि प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.



