Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Zee 5 ने सात भाषांमध्ये आपली आतापर्यंतची सर्वात व्यापक बहुभाषिक स्लेट केली सादर !

 Zee 5 ने सात भाषांमध्ये आपली आतापर्यंतची सर्वात व्यापक बहुभाषिक स्लेट  केली सादर ! 


हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला भाषांमधील व्यापक कंटेंट स्लेटसह, Zee 5 भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या, धाडसी आणि आकर्षक कथा एकाच मंचावर आणते.


मनोरंजन फक्त ट्रेंड्सचे अनुकरण करत पुढे जात नाही. ते स्वतः नवीन ट्रेंड्स निर्माण करून पुढे जाते. भारताचे सर्वात मोठे स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, Zee 5 ने नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी खास तयार केलेल्या कथा, निर्माते आणि फॉरमॅट्सचे आपले आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाकांक्षी बहुभाषिक प्रदर्शन सादर केले आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला भाषांमध्ये पसरलेला हा मंच मूव्हीज, सीरिज, लाईव्ह स्पोर्ट्स, एआय संचलित स्टोरीटेलिंग, ॲनिमेशन आणि किड्स एंटरटेनमेंटच्या व्यापक लाइन अपला एकाच ठिकाणी आणतो.



मनोरंजन हे निडर, सांस्कृतिक मुळांशी जोडलेले आणि दुर्लक्षित करता येणार नाही असे असावे, या दृढ विश्वासावर आधारलेली ही नवीन स्लेट Zee 5 चे दीर्घकालीन व्हिजन दर्शवते. ज्याचा उद्देश केवळ मनोरंजन करण्याऐवजी संवाद सुरू करणाऱ्या, संस्कृतीला आकार देणाऱ्या आणि भाषा व सीमांच्या पलीकडे जाणाऱ्या कथांची निर्मिती करणे हा आहे. प्रतिष्ठित फ्रँचायझी आणि प्रीमियम ओरिजिनल्सपासून ते नवीन फॉरमॅट्स तयार करण्यापर्यंत, Zee 5 भारत आणि जगभरातील प्रेक्षकांबद्दलची आपली बांधिलकी अधिक दृढ करण्यासोबतच स्टोरीटेलिंगच्या सीमांचा विस्तार करणे सुरू ठेवत आहे.


https://youtu.be/5WBHhqUNh4E


Zee 5 च्या या स्लेटला असाधारण क्रिएटिव्ह पार्टनर्सची साथ मिळाली आहे, ज्यामध्ये भारतातील काही अत्यंत प्रसिद्ध स्टुडिओ, फिल्ममेकर्स आणि स्टोरीटेलर्सचा समावेश आहे. हिंदीमध्ये, Zee 5 ने जिओ स्टुडिओज, मॅडॉक फिल्म्स, आझ फिल्म्स, 200 नॉटआऊट सिनेमाज, डाइस मीडिया, कलेक्टिव्ह स्टुडिओज हिस्ट्रीव्हर्स, टिप्स फिल्म्स, पेन स्टुडिओज, इलिप्सिस एंटरटेनमेंट, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि जार पिक्चर्स सारख्या अग्रेसर प्रोडक्शन हाऊसेससोबत हात मिळवले आहे. प्रादेशिक बाजारांतही उद्योगाचा दिग्गजांशी भागीदारी करून प्लॅटफॉर्मने आपल्या प्रादेशिक स्टोरीटेलिंगची वचनबद्धता अधिक मजबूत केली आहे. ज्यामध्ये मल्याळममध्ये थेस्पियन फिल्म्स; तेलुगूमध्ये अन्नपूर्णा स्टुडिओज, श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्स, सितारा एंटरटेनमेंट्स आणि श्री व्यंकटेश्वर सिने चित्र; तमिळमध्ये पॅशन स्टुडिओज आणि वृद्धी सिनेमा तेलुगू मध्ये; कन्नडमध्ये केव्हीएन प्रॉडक्शन्स; मराठीत बहावा एंटरटेनमेंट, प्रतिसाद प्रॉडक्शन्स, कायरा कुमार क्रिएशन्स आणि बांग्लामधील ॲक्रोपोलिस एंटरटेनमेंट, अंजन दत्त प्रॉडक्शन्स, व्हाय सो सिरियस फिल्म्स, सुरिंदर फिल्म्स यांसारख्या आघाडीच्या प्लॅटफॉर्म्सचा तसेच बहुभाषिक निर्मितीसाठी झी स्टुडिओजचा समावेश आहे.


हिंदी स्लेटमध्ये धाडसी नवीन ओरिजिनल्स, आयकॉनिक फ्रँचायझींचे पुनरागमन आणि प्रतिष्ठित चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवीन सीरिजमध्ये - विनोद कांबळीच्या जीवनावर आधारित 'कांबळी', 'द स्कॅम: लीक्ड', 'कॉफी किंग', आणि आर. माधवन होस्ट ज्याला करणार असा शो 'जीना इसी का नाम है 2.0' तसेच आयकॉनिक 'झी हॉरर शो' समाविष्ट आहेत. त्याबरोबर पुनरागमन करत असलेल्या फ्रँचायझींमध्ये - मोहित रैना आणि अरुणोदय सिंघ अभिनीत 'रंगबाझ सीझन 4', भुवन अरोरा स्टारर 'जनावर 2' आणि राजेश तैलंग व शीबा चड्ढा अभिनीत 'बकैती सीझन 2' आहेत. थिएटर्स आणि डायरेक्ट टू डिजिटल रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये - वरुण धवन, पूजा हेगडे आणि मौनी रॉय स्टारर 'है जवानी तो इश्क होना है', बॉबी देओल आणि सान्या मल्होत्रा यांचा 'बंदर', कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला 'भारत भाग्य विधाता', मृणाल ठाकूर आणि हुमा कुरेशी स्टारर 'पूजा मेरी जान', वाणी कपूर अभिनीत 'सर्वगुण संपन्न', अर्शद वारसी, तिग्मांशू धुलिया आणि प्रतीक गांधी यांचा 'घमासान', मिथिला पालकर आणि गौहर खान यांच्यासोबत 'इकरूप' तसेच जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट यांच्या 'डालिम्ब'चा समावेश आहे.


'लँग्वेज फर्स्ट' (भाषा-प्रथम) या रणनीतीला अधिक बळकट करत Zee 5 तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला भाषांमध्ये व्यापक स्लेटसह मुळांशी जोडलेल्या, सांस्कृतिकदृष्ट्या अस्सल कथांना प्रोत्साहन देत आहे. तमिळ भाषेत प्रेक्षक 'कूसू मुनिस्वामी वीरप्पन' आणि 'तडायम'च्या पुनरागमनाच्या प्रतीक्षेसोबतच, 'अनंतकालम' आणि पहिलावहिला इंडिपेंडेंट रॅप बॅटल शो 'ती कुरल' सारख्या नवीन ओरिजिनल्सचा आनंद घेण्यासाठी सज्ज होऊ शकतात. मूव्ही स्लेटमध्ये अत्यंत उत्सुकतेने वाट पाहिली जात असलेला 'डेमॉन्टे कॉलनी 3', नयनतारा आणि कवीन स्टारर 'हाय!', तसेच 'रावडी' हे मुख्य आकर्षण आहेत. तेलुगूमध्ये प्लॅटफॉर्मवर निवेथा थॉमस अभिनीत 'श्रीमती' आणि श्रीकांत अभिनीत 'ऑब्जेक्शन माय लॉर्ड' सारखे ओरिजिनल्स रिलीज होतील. यासोबतच ब्लॉकबस्टर टॉक शो 'जयम्मु निश्चियम्मु रा'चे पुनरागमन होईल. मूव्ही लाइन अपमध्ये सर्वाधिक प्रतीक्षित 'व्यंकी अनिल 5', 'एनबीके 111' आणि 'वृषकर्मा' सारख्या चित्रपटांचा समावेश होत आहे.


कन्नडमध्ये 'अय्यना मने' नवीन सीझनसह परत येत आहे, तर 'बिटकॉइन स्कॅम' आणि 'ऑपरेशन बंगारा' नवीन ओरिजिनल्सची व्याप्ती वाढवत आहेत. मूव्ही लाइन अपमध्ये प्लॅटफॉर्म राज बी. शेट्टी आणि प्रज्वल देवराज यांचा 'कारावली' देखील आणत आहे. मल्याळममध्ये Zee 5 'अ क्वीन', 'मलाबार कप' च्या प्रीमियरसोबतच मल्याळममधील स्वतंत्र रॅप बॅटल शो 'केरल अंडरग्राउंड' चे प्रीमियर करेल. याव्यतिरिक्त, या सीझनचा अत्यंत गाजलेल्या चित्रपट 'बालन द बॉय' देखील यात समाविष्ट आहे. मराठी प्रेक्षक 'हे काय नवीन?'च्या नवीन सीझनसह नवीन ओरिजिनल 'अगा आई, आहो आई' आणि ब्लॉकबस्टर चित्रपट 'तुंबाडची मंजुला' व 'भूतं भयम्'ची प्रतीक्षा करू शकतात. बांग्ला प्रेक्षकांचे आवडते शो 'श्वेतकाली' आणि 'लालबजार' नवीन सीझनसह परत येत आहेत, तर 'आलोर दोष' आणि 'प्रियो बंधू' सारखे शो ओरिजिनल्सच्या स्लेटला आणखी मजबूत करतात. एकत्रितपणे, हे सर्व टायटल्स प्रत्येक भाषेमध्ये प्रीमियम मनोरंजनाचे एकमेव गंतव्यस्थान म्हणून Zee 5 चे स्थान पुन्हा एकदा मजबूत करतात.


या प्रसंगी Zee 5 चे बिझनेस हेड तेजकरण सिंग बजाज सांगितलें, "Zee 5 वर आम्ही केवळ मनोरंजन क्षेत्राचे अनुकरण करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आम्ही त्याला नवीन आकार देण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही जी काही कथा सांगतो ती एका सोप्या फिलॉसॉफीने प्रेरित असते: धाडसी प्रोजेक्ट्सचे समर्थन करणे, पठडीबाहेरच्या विचारांना चालना देणे आणि असे अनुभव तयार करणे जे प्रेक्षकांना इतर कुठेही मिळू शकणार नाहीत. सात भाषांमध्ये मूव्हीज, सीरिज, लाईव्ह स्पोर्ट्स, एआई संचलित स्टोरीटेलिंग, ॲनिमेशन आणि किड्स कंटेंटच्या माध्यमातून भारतातील काही अत्यंत प्रसिद्ध फिल्ममेकर्स, प्रोडक्शन हाऊसेस आणि कलाकारांना एकाच मंचावर आणणारी आमची ही स्लेट आमच्या हेतूंची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे. अर्थात हा आमच्या ट्रान्सफॉर्मेशनाचा केवळ एक भाग आहे. आम्ही बोल्ड कंटेंट व्हिजनसह भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्मार्टर टेक्नॉलॉजी, उत्तम प्रॉडक्ट एक्सपिरियन्स आणि अधिक वैयक्तिकीकरण (डीपर पर्सनलायझेशन) यांसह भविष्यवेधी (फ्युचर रेडी) एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. ही स्लेट केवळ टायटल्सची लाइन अप नाही, तर भारताचे सर्वात लाडके स्वदेशी मनोरंजन व्यासपीठ बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे ते प्रतिबिंब आहे, एक असे व्यासपीठ जिथे देशातील सर्वात आकर्षक कथा, आघाडीचे निर्माते आणि धाडसी विचार एकत्र येतात."


Zee 5 चे चीफ कंटेंट ऑफिसर राघवेंद्र हुन्सूर या विषयी म्हणाले, "या स्लेटमधील प्रत्येक टायटलची निवड एका विशिष्ट उद्देशाने करण्यात आली आहे. आमच्यासाठी चांगल्या कंटेंटचा अर्थ केवळ कंटेंटचे प्रमाण वाढवणे नव्हे तर प्रेक्षकांशी अर्थपूर्णरित्या जोडल्या जाणाऱ्या कथांना प्रोत्साहन देणे हा आहे. भारतातील प्रेक्षक आता विविध भाषा, जॉनर (प्रकार) आणि फॉरमॅट्सशी अतिशय सहजतेने कनेक्ट होतात आणि आमची कंटेंट स्ट्रॅटेजी याच बदलाला प्रतिबिंबित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही स्लेट अशा कथांना एकत्र आणते ज्या प्रेक्षकांच्या वैविध्यपूर्ण अपेक्षा पूर्ण करतात. आमचे लक्ष अशा कथांची बाजू घेण्यावर आहे ज्या आपल्या निवडीमध्ये निर्भीड असतील, सामान्य कक्षेबाहेरच्या असतील, आवाजात बुलंद असतील आणि भारत तसेच भारताबाहेरील प्रेक्षकांसोबतही कनेक्ट होण्याची उत्तम क्षमता बाळगून असतील."


स्क्रिप्टेड मनोरंजनाव्यतिरिक्त, Zee 5 लाईव्ह स्पोर्ट्स, एआय, ॲनिमेशन आणि मुलांच्या कंटेंटद्वारे आपल्या मनोरंजनाच्या इकोसिस्टमचा विस्तार करण्याचे काम सतत करत आहे. प्लॅटफॉर्मच्या वाढत्या स्पोर्ट्स पोर्टफोलिओमध्ये फिफा (FIFA®️), बुंडेसलिगा (Bundesliga), आयएलटी सीझन 5 (ILT Season 5) आणि तमिळनाडू कबड्डी यांसारख्या जागतिक स्पोर्ट्स प्रॉपर्टीजचा समावेश आहे. सोबतच, स्लेटची व्याप्ती वाढवत प्लॅटफॉर्मवर 'गरुड - एक योद्धा की गाथा', 'नर्मदा मानस सुंदरी', 'विक्रम बेताळ', 'शिव सती - एक अनंत प्रेम कहानी', 'परम सुंदरी चंद्रकांता', 'तिरुपती बालाजी', 'राम आंजनेय युद्ध' आणि 'अय्यप्पन' सादर केले जात आहेत. यासोबत मुलांच्या मनोरंजनासाठी 'शिवलोक के कुंडक्का मंडक्का', 'स्मार्ट किड्स', 'टेल्स ऑफ कृष्णा' आणि 'बँडबुध और बुडबक 2.0'चा समावेश करण्यात आला आहे. हा संपूर्ण कंटेंट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी खरोखरच एक समग्र (होलिस्टिक) आणि सर्वसमावेशक मनोरंजन गंतव्यस्थान बनवण्याची प्लॅटफॉर्मची वचनबद्धता आणखी मजबूत करतो.


या ऐतिहासिक स्लेटसह, Zee 5 एका अशा ठिकाणाच्या रूपात आपले स्थान सुदृढ करत आहे, जिथे भारताच्या सर्वात अनोख्या कथा आकार घेतात. सात भाषांमधील प्रतिष्ठित भागीदारी, नामवंत फ्रँचायझी, नवीन व मौलिक ओरिजिनल्स आणि कथांना एकत्र आणून ही स्लेट स्केलमध्ये धाडसी, महत्त्वाकांक्षेत अदम्य, निवडीमध्ये अपरंपारिक आणि आपल्या आवाजात बुलंद आहे, जे अजोड पातळीवर वेगळे आणि अद्भूत मनोरंजन प्रदान करण्याच्या प्लॅटफॉर्मच्या निरंतर फोकसला दर्शवते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.