Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*भितीदायक लोकेशन्सवर रंगला ‘भूतम भयम्’चा थरार!*

 *भितीदायक लोकेशन्सवर रंगला ‘भूतम भयम्’चा थरार!*


झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ पडद्यावर प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. मात्र या चित्रपटातील अंगावर काटा आणणाऱ्या दृश्यांमागे केवळ दमदार व्हीएफएक्स नव्हते, तर प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान कलाकारांनी अनुभवलेले अनेक थरारक क्षणही होते. चित्रपटासाठी निवडलेल्या निर्जन आणि गूढ लोकेशन्समुळे सेटवर कायम एक रहस्यमय वातावरण निर्माण झालं होतं. इतकंच नव्हे, तर शूटिंग संपल्यानंतरही कलाकारांना एकटं बाहेर फिरण्याची भीती वाटायची. कुठेही जायचं झालं की ते एकमेकांना सोबत घेऊनच जात असत.



रहस्यमय वातावरण, सभोवताली पसरलेली शांतता आणि लोकेशन्सचा गूढपणा यामुळे संपूर्ण शूटिंगदरम्यान कलाकारांना वेगळाच अनुभव आला. त्यामुळे पडद्यावरील भीती आणि थरार अधिक वास्तवदर्शी साकारण्यात या लोकेशन्सची महत्त्वाची भूमिका ठरली. 


याविषयी नील साळेकर म्हणाला, ‘’आम्ही ज्या लोकेशन्सवर शूटिंग केलं, तिथलं वातावरण खूपच भयानक होतं. शूटिंग संपल्यानंतरही एकटं कुठे जायची हिंमत होत नव्हती. बाहेर फिरायला निघालो तरी आम्ही कायम एकमेकांना सोबत घेऊनच जायचो. त्या वातावरणामुळे चित्रपटात काम करतानाही एक वेगळाच थरार कायम जाणवत होता.’’


शुभम जाधव म्हणाला, “लोकेशन्स इतकी वास्तव आणि भयावह होती की, कॅमेरा बंद झाल्यानंतरही ती भीती मनातून जात नव्हती. एकटं फिरण्यापेक्षा आम्ही सगळे मिळूनच फिरायचो. त्या अनुभवामुळे चित्रपटातील प्रत्येक प्रसंग अधिक जिवंत वाटू लागला. प्रेक्षकांनाही हा थरार नक्कीच जाणवेल.”



रामचंद्र अरुण गांवकर लिखित व दिग्दर्शित, नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्मित ‘भूतम भयम्’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होत असून, यात छाया कदम, करण सोनावणे, निनाद लिमये, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मनमीत पेम आणि प्रताप फड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.