Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ व्हायरल पोस्टर बॉय नेमका आहे कोण? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

 बायको पाहिजेचं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

व्हायरल पोस्टर बॉय नेमका आहे कोण? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

 


सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हातात “बायको पाहिजे” असे पोस्टर्स घेऊन उन्हातान्हात फिरणारा हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणाचं नाव आहे धनराज धोंडीराज दांगट. धनराजवर अशी वेळ का आलीबायको शोधण्यासाठी तो इतका वणवण का भटकतो आहेआणि हा सगळा प्रयत्न नेमका कशासाठीया साऱ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

मुंबईतील बस स्टॉपरेल्वे स्टेशन जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जाऊन धनराजने आपल्या आयुष्याचा साथीदार मिळवण्य़ासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्याचा हा हटके आणि धाडसी प्रयत्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असूनअनेकांच्या कुतूहलाला कारणीभूत ठरत आहे.



आता या सगळ्या प्रयत्नांना यश मिळतं काधनराजला त्याची अपेक्षित “बायको” सापडते काकी त्याच्या शोधाची गोष्ट आणखी वेगळं वळण घेते? हे सगळं पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.