अर्बनराईज ‘व्हिस्पर्स ऑफ स्काय’ साठी ‘सेलिब्रिटी लाइफ’ मोहिमेत गौरी खान आघाडीवर
मुंबई ५ मार्च : दक्षिण भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या अर्बनराईज ने आपल्या नव्याने सुरू झालेल्या लक्झरी प्रकल्पासाठी 'वेलकम टू द सेलिब्रिटी लाइफ' ही नवी जाहिरात मोहीम सादर केली आहे. व्हिस्पर्स ऑफ स्काय या प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गौरी खान प्रमुख भूमिकेत दिसत असून या मोहिमेचे दिग्दर्शन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांनी केले आहे.
प्रभावी दृश्यात्मक मांडणी आणि कथनशैलीच्या माध्यमातून ही मोहीम दोन लघुपटांच्या मालिकेद्वारे साकारण्यात आली आहे. या दोन चित्रफितींमध्ये गौरी खान यांचे दोन वेगवेगळे पैलू दाखविण्यात आले आहेत.
पहिल्या चित्रफितीत त्या एक नामांकित डिझायनर म्हणून दिसतात. जागेची रचना, साहित्याची निवड आणि सूक्ष्म तपशील यांमध्ये त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यदृष्टी कशी प्रतिबिंबित होते, हे यातून दाखविण्यात आले आहे.
दुसऱ्या चित्रफितीत त्या सेलिब्रिटी आयकॉनच्या रूपात दिसतात. प्रकल्पातून साकारण्यात आलेली आकर्षक जीवनशैली, आत्मविश्वास आणि ग्लॅमर यांचे प्रतिनिधित्व त्या करतात.
या दोन चित्रफिती डिझाइन आणि सेलिब्रिटी या दोन घटकांना एकत्र आणत एक सुसंगत कथानक उभे करतात. यात केवळ गौरी खान यांनी कल्पना केलेली जागाच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली जीवनशैलीही अधोरेखित केली आहे. दृश्यात्मकता, वातावरण आणि आकर्षक मांडणी यांवर भर देत या मोहिमेत स्टार उपस्थितीला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
या सहकार्याबद्दल बोलताना गौरी खान म्हणाल्या, “व्हिस्पर्स ऑफ स्कायच्या डिझाइनमध्ये परिष्कृतता आणि कालातीत आकर्षण यांवर विशेष भर देण्यात आला आहे. मोहिमेतील सूक्ष्म तपशील आणि दृश्यात्मक मांडणीमधून ते प्रभावीपणे व्यक्त केले आहे.

