Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ठरलं तर या दिवशी अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या " संभवामी युगे युगे " होणार पहिला शो !

 ठरलं तर या दिवशी अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या " संभवामी युगे युगे " होणार पहिला शो !


दुबई मध्ये रंगणार "संभवामी युगे युगे" चा पहिला शो !


कृष्ण रुपात दिसणारी संस्कृती आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तिच्या या लूकच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय आणि हा खास लूक आणि तिच्या मनाच्या अगदी जवळच्या असलेला हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



काही दिवसांपूर्वी संस्कृती ने सोशल मीडिया वर तिच्या या नव्या लूक आणि प्रोजेक्ट बद्दल सांगितल होत. "संभवामी युगे युगे" हा तिचा पहिला वहिला डान्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार असून साता समुद्रापार दुबई मध्ये याचा पहिला शो येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे.


जगाच्याबाहेर जाऊन हा शो परफॉर्म करण्यासाठी संस्कृती सज्ज होताना दिसतेय या प्रोजेक्ट मागची तिची मेहनत तिच्या BTS मधून अनुभवयाला मिळत असून हा शो भारतात देखील लवकरच होणार असल्याचं कळतंय.


या बद्दल बोलताना संस्कृती सांगते "संभवामी युगे युगे" या डान्स ड्रामाचा शुभारंभ आम्ही दुबई मध्ये करतोय खूप उत्सुकता आहे तेवढी धाकधूक देखील होते आहे कारण परदेशात जाऊन हा पहिला शो करणं हे आमच्यासाठी खूप खास आहे दुबई मधला प्रेक्षकवर्ग पहिल्यांदा हा सगळा सोहळा अनुभवणार आहे. "संभवामी युगे युगे" ची एक सुंदर छान सुरुवात व्हावी आणि ती सुद्धा दुबई मध्ये हे आमचं आधी पासून ठरलं होत. दुबई नंतर भारतात आपल्या महाराष्ट्रात याचे शो करण्यासाठी देखील मी तितकीच उत्सुक आहे. कृष्णाला भाषा नसते अस म्हणतात आणि म्हणून परदेशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा विचार असल्याने आम्ही हा पहिला शो परदेशात करण्याचं ठरवलं. "संभवामी युगे युगे" लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच सज्ज आहोत"




दिग्गज कलाकार सुमित राघवन यांनी संस्कृती साकारणार असलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी आवाज दिला असून या प्रोजेक्ट मध्ये वैविध्यपूर्ण गोष्टीचा मिलाप बघायला मिळणार आहे. कृष्णाच्या रूपाची लिलया आणि किमया लवकरच दुबई मधल्या प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही.


https://www.instagram.com/p/DR1HFRKDEC8/?igsh=MTB4OXoweDBybm5qZg==

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.