अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांच्या रुपेरी वाळूत गण्यामागची खास गोष्ट बघा...
ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असून नुकतंच अभिजीत ने सोशल मीडिया वर एक या गाण्याचा मागची गोष्ट शेयर केली आहे.
अलिबाग मध्ये शूट झालेलं "रुपेरी वाळूत" हे गाणं येत्या 5 डिसेंबरला प्रेशकांच्या भेटीला येणार असून अभिजीत या गाण्यात गौतमी सोबत परफॉर्म करताना देखील बघायला मिळतोय. गायनाच्या सोबतीने अभिनयाची धुरा देखील त्याने यात पार पडली आहे.
2025 वर्ष अभिजीतसाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स सोबतीने खास करणार आहे. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना अनेक ट्रेंडी गाणी त्याने संगीत इंडस्ट्रीत केली आणि तो एक ट्रेंड सेटर गायक ठरतोय. अलीकडे त्याने आय पॉपस्टार सारख्या बड्या शो मध्ये जेन झी साठी त्याचा सदाबहार गाण्याचं ट्विस्ट आणि नवीन व्हर्जन गायलं आणि ते सुद्धा ट्रेंड झाल.
समुद्रकिनारा, रुपेरी वाळूत गौतमी आणि अभिजीत यांनी शूट केलेलं हे गाणं प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही.
https://www.instagram.com/reel/DRwp1iFCI84/?igsh=MW81aW1vaWh0dDR2cw==

