अखेर अभिजीत आणि गौतमी यांच्या त्या व्हिडिओ मागचं गुपित प्रेक्षकांना समजलं !
अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील यांच्या व्हायरल व्हिडीओ या गाण्याचा असणार आहे !
ठरलं तर गायक अभिजीत सावंत घेऊन येतो नवीन गाणं !
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी सोशल मीडिया वर एक AI व्हिडीओ शेयर केला होता आणि आज या व्हिडिओ मागचं खरं कारण प्रेक्षकांना समजला आहे. सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना मोहित करणारा अभिजीत सावंत लवकरच अजून एका नव्या गाण्या मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात गाण्याचा ट्विस्ट म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीत सावंत सोबत यात काम करताना दिसणार आहे.
2025 वर्षात अभिजीतने अनेक ट्विस्ट असलेली ट्रेंडिंग गाणी गायली आणि पुन्हा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. चाल तुरु तुरू पासून नुकतंच प्रदर्शित झालेलं आय पॉपस्टार मधल मोहब्बते लुटाऊंगाच नवकोर जेन झी व्हर्जन असू दे कायम अभिजीत ने त्याचा सदाबहार आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.
आता गायक अभिजीत सावंत लवकरच "रुपेरी वाळूत" हे नवं कोर गाणं घेऊन येत आहे आणि गाण्यात त्याच्यासोबत गौतमी पाटील देखील वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 5 डिसेंबरला हे गाणं प्रदर्शित होणार असून आता हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की अजून काही हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.
सोशल मीडिया वरचा अभिजीत आणि गौतमी यांचे बीच वरचे फोटो व्हायरल होत असलेला AI व्हिडिओ आणि आज या गाण्याची झालेली घोषणा सगळचं बघण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत.

