लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान पोहचले सिद्धिविनायक मंदिरात !
समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांनी बाप्पाच दर्शन घेत सुखी संसाराला केली सुरुवात !
राजकीय आणि मनोरंजन विश्वात चर्चेत असलेली एक जोडी जी नुकतीच लग्न बंधनात अडकली ते म्हणजे निर्माती अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर. मुंबईमध्ये दिग्गजांच्या उपस्थित त्यांचा लग्नाचा सुंदर सोहळा संपन्न झाला.
लग्नानंतर या जोडी ने पहिल्यांदा सोबत जाऊन सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाच्या आशीर्वादाने सुखी संसाराला सुरुवात केली. सिदधिविनायक मंदिराच्या सोशल मीडिया टीमने या नव दाम्पत्याचे सुंदर फोटो शेयर केले आहेत.
तेजस्विनीच्या लग्नाच्या प्रत्येक मनमोहक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून तिच्या लूक बद्दल तितकीच चर्चा होताना दिसतेय. समाधान आणि तेजस्विनी यांच्या या सहजीवनाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने अजून छान झाली आहे.
