*निवेदितेचा २४ तासांचा निर्धार करणार भैरवीची निर्दोष सुटका!*
पहा ‘अशोक मा.मा.’ महारविवार, ७ डिसेंबर, रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई ३ डिसेंबर, २०२५ :* कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेमध्ये ‘सुखठणकर फुड्स’च्या स्वादिष्ट मोदकांसाठी घराघरात पोहोचलेल्या माजगांवकरांचे घर अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मोठ्या सेलिब्रेशनचे वातावरण असतानाच, भैरवी माजगांवकर यांनी बनवलेल्या मोदकांमुळे शहरातील दीडशेहून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची तक्रार समोर आली आणि त्यामुळे भैरवी व तिच्या कुटुंबावर संकट कोसळणार आहे. FDA आणि पोलिसांच्या धाडीमुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होणार असून, यामागे कोणाचे कारस्थान आहे याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण होणार आहेत. सेलिब्रेशनच्या क्षणी बरीच मंडळी रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने कुटुंब हादरले, तर राजन यांनी गोडाऊन सील झाल्याची माहिती दिल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. भैरवीची अटक होणार हे स्पष्ट होताच, तिचे सासरे म्हणजेच अशोक मा.मा. पुढे सरसावले आणि पोलिसांसमोर आर्त विनवणी करत जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी, निवेदिता यांनी परिस्थितीवर नियंत्रण घेत ‘२४ तासांचा’ शब्द दिला. या वेळेत त्या या कटाचा खरा सूत्रधार शोधून काढणार असा शब्द दिला. निवेदितेचा विश्वास पाहून पोलिसांनी आश्चर्य वाटले. आता या तपासाचे सूत्र त्यांच्या हातात देणार ? भैरवीला निवेदिता कशी सोडवणार ? मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा ‘अशोक मा.मा.’ मालिकेचा महारविवार एका तासाचा विशेष भाग ७ डिसेंबर, रात्री ८ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
या प्रचंड गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, भैरवी पोलिसांच्या ताब्यात असून निवेदिता वेळेशी स्पर्धा करत मोदकांच्या नमुन्यांपासून ते डिलिव्हरी रुटपर्यंत प्रत्येक धागा कशी तपासणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. निवेदिता खऱ्या दोषीपर्यंत पोहोचू शकेल का? माजगांवकर कुटुंबावर आलेलं हे संकट निवेदिता दूर करू शकेल का? जाणून घेण्यासाठी पाहा ‘अशोक मा.मा.’ मालिकेचा महारविवारचा एका तासाचा विशेष भाग ७ डिसेंबर, रात्री ८ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.


