*श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार?*
पहा, ‘इंद्रायणी’, ७ डिसेंबर, संध्या. ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
*मुंबई २ डिसेंबर, २०२५ :* कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील ७ डिसेंबरचा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. कथानकात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका अनपेक्षित अध्यात्मिक वळणामुळे संपूर्ण मालिकेमधील घटनाच बदलणार आहेत. इंद्रायणी आणि श्रीकला यांच्या संघर्षाला या प्रसंगामुळे नवी धार मिळणार असून घराघरात उत्सुकता निर्माण करणारा नाट्यमय क्षण उलगडणार आहे. श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार? जाणून घेण्यासाठी पहा, ‘इंद्रायणी’, ७ डिसेंबर, संध्या. ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.
किर्तन सुरू होण्याआधीच श्रीकला इंद्रायणीला एक संशयास्पद इशारा देते “आज व्यंकू महाराजांच्या कीर्तनात काही तरी होणार आहे…” कीर्तनादरम्यान भावनिक झालेल्या व्यंकू महाराजांना सावरण्यासाठी इंद्रायणी पुढे येते, पण त्याआधीच गोपाळ आश्चर्यकारकपणे पुढे येतो. पहिल्यांदाच तो स्वतःहून मंदिरात प्रवेश करतो आणि व्यंकू महाराजांना अलगद आधार देतो. त्यानंतर तो थेट विठुरायांच्या चरणी जातो, नमस्कार करतो आणि पूर्ण भक्तिभावाने *टाळ* वाजवू लागतो असा क्षण ज्याने संपूर्ण मंदिर स्तब्ध होतं. व्यंकू महाराजांच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ते गोपाळमधील बदलाचे संपूर्ण श्रेय श्रीकलाला देत दोन्ही हात जोडून तिचे आभार मानतात. श्रीकला हा क्षण आपल्या ‘विजयाचा’ शिखर मानते आणि तीच जिंकली असा इंद्रायणी ला खिजवते ; मात्र इंद्रायणी शांत हसून तिचे सर्व गणित बिघडवत म्हणते “धन्यवाद, श्रीकला हे करून तू उलट माझ जिंकणं अजून सोपं केलंस.” या एका वाक्याने श्रीकला गोंधळून जाते आणि इथूनच संघर्षाला नवं वळण मिळतं.
आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न इंद्रायणीच्या डोक्यात नेमका काय प्लॅन आहे? गोपाळचा हा भावनिक क्षणच श्रीकलासाठी सापळ्यात फसण्याचं कारण ठरेल का ? की श्रीकला पुन्हा एकदा परिस्थिती आपल्या बाजूने वळवून इंद्रायणीच्या आयुष्यात नवं वादळ उठवणार? ७ डिसेंबरचा भाग या प्रश्नांची उत्तरं देत कथानकाला एक धक्कादायक वळण देणार आहे.पहा, ‘इंद्रायणी’, ७ डिसेंबर, संध्या. ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.



