Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला घेतले स्वामी दर्शन!

 दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला घेतले स्वामी दर्शन!

पहा ४ ते १० डिसेंबर, रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठीवर. 



मुंबई ४ डिसेंबर, २०२५ : दत्तजयंतीच्या मुहूर्तावर कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी एक भव्यदिव्य, भावपूर्ण आध्यात्मिक कथा दत्तजयंती विशेष सप्ताहाच्या स्वरूपात घेऊन आली आहे. याच दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आजपासून ४ ते १० डिसेंबर रात्री ८ वाजता प्रसारित होणारे हे विशेष भाग स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य, त्यांच्या भक्त कृपा, लीला आणि ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांच्या शक्तींचा एकत्रित अनुभव साकार करतील. दत्त म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार यांचा परम संगम आणि या तीन शक्तींचं दिव्य प्रगटीकरण प्रेक्षकांना प्रथमच एका सलग कथेत आठवडाभर विस्ताराने अनुभवायला मिळणार आहे.



या विशेष अनुभवाबद्दल बोलताना अक्षय मुडावदकर म्हणाले, “स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनात अपरंपार समाधान आणि ऊर्जा मिळते. प्रेक्षकांकडून आणि स्वामी भक्तांकडून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळालाय. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की त्यांच्या कृपेचा स्पर्श नक्कीच लाभतो. आज माझ्या हस्ते प्रसाद वितरण झालं, वातावरण संपूर्ण भक्तिमय होतं. योग्य दिवशी हा योग आला आणि मी अक्षरशः भावनेने भारावून गेलो. स्वामी समर्थ महाराजांचं सदैव ऋणी आहे, यंदा स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य आम्ही मालिकेत उलगडणार आहोत,त्या पार्श्वभूमीवर हा योग जुळून येणे अलौकिक गोष्ट आहे” 



ही विशेष कथा रंजना नावाच्या एका तरुणीच्या संघर्षमय आयुष्याभोवती फिरते, जिथे काका-काकूंचा छळ, भावाचा जीवघेणा आजार आणि गावगुंड अभिरामच्या अत्याचारामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं दिसतं. आजच्या काळाचे प्रतिबिंब असलेल्या रंजनाच्या असहाय हाकेला स्वामी कसे उत्तर देतात आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ तीन रूपांत कसे प्रकट होतात - ब्रह्मरूप प्रजापती, विष्णूरूप नारायण आणि रुद्ररूप महेश या रूपात वेगवेगळे येण्याचे त्यांचे प्रयोजन काय? उत्पत्ती, पालन आणि संहार तत्त्वाच्या या तिन्ही दैवी शक्ती एकत्र आल्यानंतर घडणारा चमत्कार नेमका काय असेल याची उत्तरे या दत्तजयंती विशेष सप्ताहात मिळणार आहेत. अध्यात्म, भक्ती, चमत्कार आणि मानवी भावनांचा सुंदर संगम असलेले हे विशेष भाग प्रेक्षकांना श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेची दिव्य अनुभूती देतील. तेव्हा ‘जय जय स्वामी समर्थ दत्तजयंती विशेष’, ४ ते १० डिसेंबर, रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.