Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

 महाराष्ट्राची इच्छा पूर्ण! सलमान खानने जाहीर केला बिग बॉस मराठीचा होस्ट — रितेश देशमुख! 

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर. 



मुंबई १ डिसेंबर, २०२५ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ६ च्या टीझरने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले... त्यानंतर शोचे तमाम प्रेक्षक अजून एका मोठ्या घोषणेची आतुरतेने वाट बघत होते आणि ती म्हणजे यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन कोण करणार? प्रेक्षकांची एकच मनापासून इच्छा होती की या वर्षीही भाऊ म्हणजेच रितेश देशमुख यांनीच हा सीझन होस्ट करावा. आणि अखेर ही इच्छा पूर्ण झाली ती थेट बिग बॉस हिंदीच्या भव्य मंचावर! सर्वांच्या लाडक्या भाई म्हणजेच सलमान खान यांनी या वर्षाची सर्वात मोठी घोषणा करत रितेश देशमुख यांचे खास स्वागत केले आणि जाहीर केले की बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार. भाईकडून भाऊची अशी स्टाइलमध्ये ओळख करून देणं हा क्षण प्रेक्षकांसाठी भावनिकही होता आणि अभिमानास्पदही. देशभरातील प्रेक्षकांच्या आवडीचे दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी एकमेकांना शुभेच्छा देताना पाहून चाहत्यांना आनंद झाला.


सलमान खानने रितेश देशमुखचे प्रेमाने आणि दबंग स्टाईलने बिग बॉस हिंदीच्या मंचावर स्वागत केले, 'बिग बॉस नंतर देखील एंटरटेनमेंट सुरूच राहणार आहे कारण लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे आणि तो घेऊन येणार आहे माझा लाडका भाऊ रितेश देशमुख. भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम solve केला आहेस बिग बॉस हिंदी संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी तू घेतली आहेस. यावेळेस नवीन काय असणार आहे."


रितेश देशमुख म्हणाला,"पहिले तर तुम्हाला ब्लॉकब्लस्टर सिझनसाठी खूप शुभेच्छा. मी रोज बघतोच आहे, सगळ्यांना देखील हा सिझन खूप आवडतो आहे. यावेळेस मराठी सिझनमध्ये आपण एका दरवाज्यातून सदस्यांचे स्वागत करतोच पण आता आत गेल्यानंतर खूप दरवाजे त्यांचे स्वागत करणार आहेत. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी लपलेलं असणार आहे. काहीवेळेस चांगल्या गोष्टी असतील, काहीवेळेस shocking गोष्टी असतील. म्हणजेच दरवाज्यामागे काही ना काही असणार आहे."



सलमान खानने मागील सिझनचे देखील कौतुक केले आणि येणाऱ्या सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. याचसोबत रितेश देशमुख यांनी एक एलिमेनेशन देखील केले, सदस्यांसोबत संवाद देखील साधला. याचसोबत सलमान खान असे देखील म्हणाला कि, हा नवा सिझन मी नक्की बघणार. 


सोशल मीडियावर सलमान–रितेश यांच्या मंचावर एकत्र येण्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. सगळीकडे एकच चर्चा आहे बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख... दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी भेटताच प्रेक्षकांचा जल्लोष उसळला आणि आता एकच वाक्य ऐकू येत आहे “दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!” बिग बॉस मराठीचा हा सिझन वाजणार. तेव्हा बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच परततोय आपल्या कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.