Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*उडने की आशा चा नवा हाय-व्होल्टेज प्रोमो प्रदर्शित; रेणुकासमोर उघड होणार रोशनीचं गुपित?*

 *उडने की आशा चा नवा हाय-व्होल्टेज प्रोमो प्रदर्शित; रेणुकासमोर उघड होणार रोशनीचं गुपित?*



Promo Link:

https://www.instagram.com/reel/DSUF3MhjXYm/?igsh=MTM5aThqZ3A1aXBsOQ==


टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कायम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारं चॅनल असलेल्या स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका उडने की आशा सध्या चर्चेत आहे. दमदार कथा, भावनिक गोष्टी आणि मालिकेतील धक्कादायक वळणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका ठरली आहे. टीआरपी चार्टवरही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. दर आठवड्याला कथा अधिकच रंगत जाते आणि आता निर्मात्यांनी असा नवा प्रोमो रिलीज केला आहे जो याआधी कधीच न पाहिलेला जबरदस्त, हाय-व्होल्टेज ड्रामा घेऊन येणार असल्याचं दिसतंय. 



नव्या प्रोमोमध्ये रेणुका आणि रोशनी बॉक्सिंग कोर्टमध्ये दिसतात. रिंगच्या एका टोकाला रोशनी बसलेली आहे तर समोर हातमोजे घालून रेणुका उभी आहे. रेणुका प्रचंड रागात असून ती रोशनीचा अपमान करत म्हणते की तिला वाटलं होतं रोशनी एखादी राजकन्या आहे पण ती तर “सडकछाप” निघाली. हे ऐकून रोशनी पूर्णपणे हादरलेली, घाबरलेली दिसतेय. 


रोशनीच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट होतं की ती एखादं मोठं गुपित लपवत आहे. तेवढ्यात सचिन तिथे येतो आणि उघड करतो की रोशनीचं दुबईचं गुपित आता सगळ्यांना समजलं आहे. त्याच्या या खुलाशामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात रोशनी खरंच दुबईत राहत होती का की हे सगळं खोटं होतं?


ते बॉक्सिंग कोर्टमध्ये का आहेत? रोशनी नेमकं काय लपवत आहे? आणि हाच तो क्षण आहे का, जेव्हा तिचं सर्वात मोठं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे? प्रोमोचा शेवट हा रोशनी रिंगमध्ये रेणुकाच्या मागे धावत असल्याच्या सीन ने होताना दिसतोय. मालिकेत एक मोठं वळण येणार असून पुढील भाग प्रचंड भावनिक आणि थरारक असणार यात शंका नाही.


२२ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्लसवर ‘उडने की आशा’ पाहायला विसरू नका !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.