Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड*

 *"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड* 


भारतीय टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने अखेर स्टार प्लसवरील अत्यंत बहुचर्चित मालिका क्युँकी सास भी कभी बहू थी मालिकेतील लीपबद्दल खुलासा केला. कथानकात झालेल्या या मोठ्या बदलामागील खास विचार तिने यावेळी मांडले. 


भारतीय टेलिव्हिजन विश्वात आयकॉनिक मालिकांपैकी एक असलेली ही मालिका आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली असून मालिकेतील हा लीप केवळ नाट्यमय शेवटासाठी नाही तर भावनिक वास्तवतेवर आधारित असल्याचं एकता कपूर हिने या निमित्तानं अधोरेखित केलं आहे. 



टेलिव्हीजन क्वीन एकता कपूर म्हणाली की, "हा लीप आणण्यामागचा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला असून प्रत्येक नातेसंबंध काळानुसार कसे बदलतात याचं प्रतिबिंब यात आहे. मालिकेत होणाऱ्या या बदलाकडे एका ओळखीच्या प्रवासाचा शेवट म्हणून न पाहता त्याकडे आयुष्यात नैसर्गिकपणे घडत जाणारा यापुढचा टप्पा म्हणून पाहिले पाहिजे. ज्यात नाती येतात ती विकसित होतात मग, अंतर वाढतं आणि भावनांना नवे अर्थ येतात."


याबद्दल बोलताना पुढे एकता कपूर म्हणते "एक कथाकथनकार म्हणून क्युँकी सास भी कभी बहू थी ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. नेहमीच काळानुसार वाढणारी, तुटणारी आणि बदलणारी नाती शोधण्यामागची एक गोष्ट आहे. या कथेत लीप आणताना माझा उद्देश ही मालिका बंद करण्याचा नसून कथेला तिच्या पात्रांसोबत विकसित होऊ देण्याचा होता. यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांचं वास्तव दाखवायचा प्रयत्न आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम सुद्धा वेगवेगळ्या वळणावर आपल्याला घेऊन जात त्यावेळी होणारे गैरसमज कशा खोल जखमा देतात आणि भावनिक अंतर वाढत जात. थोडक्यात या लिपमधून प्रगल्भ नात्यांचीच गोष्ट उलगडणार आहे"


भारतीय टेलिव्हिजनच्या कथनशैलीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी "क्युँकी सास भी कभी बहू थी" ही मालिका तिची मूळ गोष्ट नव्या दृष्टीकोनातून पुढे नेणार असून आगामी भागांमधून प्रेक्षकांना अजून नवनवीन ट्विस्टस् अनुभवयाला मिळणार आहेत.


तेव्हा, दर दिवशी रात्री १०:३० वाजता फक्त स्टार प्लसवर क्युँकी सास भी कभी बहू थी पहायला विसरू नका!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.