*"क्युँकी सास भी कभी बहू थी" मध्ये येणार लीप; तुलसी–मिहिरचं आयुष्य आता वेगवेगळ्या वाटांवर!*
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्युँकी सास भी कभी बहू थी आजही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. नव्या सीझनपासूनच या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात काही ना काही मोठमोठे ट्विस्ट बघायला मिळाले आणि प्रेक्षकांमध्ये या बद्दल उत्सुकता निर्माण होताना दिसतेय आणि आता शोमध्ये तब्बल सहा वर्षांचा लीप घेत नवी कथा सुरू होत असून हा नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. या लिपमुळे मालिकेचं कथानक आणखी नव्या रंजक वळणावर जाणार आहे.
नव्या प्रमोमध्ये तुलसी एका साध्या चाळीत राहताना दिसते आणि ती प्रार्थना करत शांत, साधं आयुष्य जगताना दिसत असून अंगद आणि त्याची पत्नी वृंदासोबत आहेत दिसायला समाधानी असली, तरी तिच्या मनात एक दडपलेली वेदना स्पष्ट जाणवते. मिहिरचा फोटो पाहताच तिच्या मनात अतूट आठवणी जाग्या होतात. पूर्ण विश्वासाने ज्याच्यावर नातं टिकून राहील असं मानलं तोच मिहिर तिच्यापासून इतका दूर कसा गेला याचा प्रश्न तिच्या मनात उमटताना दिसतोय.
दुसऱ्या बाजूला मिहिर विराणी हाऊसमध्ये प्रवेश करताना दिसतो आणि एक कडू सत्य व्यक्त करतो "ज्या नात्यांनी जखमा व्हायला सुरुवात केली ती नाती तुटलेलीच बरी " मात्र त्याच वेळी एक प्रतीकात्मक क्षणही दिसतो तो तुलसीच्या रोपट्याला पाणी घालताना दाखवला आहे जणू मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी भावना अजूनही दाटून आहेत.
आता हा नवा प्रोमो बघून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. तुलसी आणि मिहिर पुन्हा एकमेकांपर्यंत पोहोचतील का? ते मनातील वेदना दूर करून जुन्या जखमा भरून काढू शकतील का? तुलसी पुन्हा एकदा विराणी परिवारात परत येईल का?
लीप एपिसोड मधली ही कहाणी बघण्यासाठी बघा क्युँकी सास भी कभी बहू थी पाहा दररोज रात्री 10:30 वाजता फक्त स्टार प्लसवर !

