*जगदंबा देणार माया आणि महिषासुराच्या कटांना जोरदार प्रतिउत्तर*
आई तुळजाभवानी दररोज रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई, ७ जुलै २०२५ –* कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे अश्रू महिषासुराने छळ करून मिळवलेले असतात. दरम्यान, महिषासुर आणि शुक्राचार्य कामनापूर्ती यज्ञ सुरू करतात. या यज्ञातून ब्रम्हदेवांकडून तुळजा प्राप्त करण्याचा त्यांचा कट आहे. पण या सगळ्यात माया आणि महिषासुर यशस्वी होणार का? आणि जगदंबा हा कट कसा परतवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या सगळ्यात जगदंबा मायाच्या अश्रूंचा उलटा वापर करून महिषासुराची तपश्चर्या भंग करते आणि तिचे अपहरण करण्याचा कट उधळून लावते. ब्रह्मदेवही या घटनेने थक्क होतो. महिषासुर निद्रेत असल्याने शुंभा अस्वस्थ होते, तर माया महिषासुराच्या मनात तिच्याविरोधात संशय निर्माण करण्याचे कारस्थान रचते. दुसरीकडे, मायाने झाडरूपात कैद केलेले आणि महादेवांनी मुक्त केलेले जनकबाबा गावात परत येतात, ज्यांच्याकडून देवीबद्दल माहिती मिळवण्यासाठी मनोरमा प्रयत्नशील आहे. सुरवंती आणि माया समोरासमोर येतात. खोट्या सोन्याने फसवणूक केलेल्या मायाचं खरं स्वरूप सुरवंती उघड करणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. मायाचा पुढचा डाव असतो – मानवी रूपातील जगदंबेच्या डोक्यावर वार करून तिला निष्प्रभ करणे. मात्र तिचा हा कट फसतो. तरीही विंचूच्या बनावाने ती गंगाईच्या अधिक जवळ जाते.
महादेव आणि नंदी देवीच्या शोधात एका गावात पोहोचतात, जिथे महादेव म्हाताऱ्याचे रूप घेतात. गावकरी रूपातील माया आपल्या असुररूपातील मनोवृत्तीने अस्वस्थ होते. ती जाणते की जगदंबाला तिच्या आईच्या मायेच्या कवचातून बाहेर काढल्याशिवाय अपहरण शक्य नाही. त्यामुळे मुलांमध्ये भांडण घालून जगदंबेला आपल्या गटात ओढण्याचा नवा डाव ती आखते. या डावात माया आपल्या मायावी शक्तीने एक असुरी "मायावृक्ष" निर्माण करते. या वृक्षाच्या प्रभावामुळे गावातील मुले नाट्यमयरित्या बंदिवान होतात. अशा परिस्थितीत गंगाईने जगदंबाला घराबाहेर पडण्याची मनाई केलेली असताना, ती या मुलांना वाचवण्यासाठी बाहेर पडेल का? की याच संधीचा फायदा घेऊन माया तिचे अपहरण करेल?
या सर्व घडामोडींसह मालिकेतील उत्कंठा शिगेला पोहोचत असून, प्रेक्षकांसमोर येणार आहे नवे संघर्ष, नवे चढउतार... जगदंबा कसे देणार माया आणि महिषासुराच्या कटांना जोरदार प्रतिउत्तर जाणून घेण्यासाठी नक्की बघा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.