एण्ड टीव्ही घेऊन येत आहे नवीन मालिका ‘घरवाली पेडवाली'
~ अलौकिक शक्तीचा ट्विस्ट असलेली हलकी-फुलकी कौटुंबिक विनोदी मालिका ~
भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है' आणि ‘हप्पू की उलटन पलटन'चे मनोरंजन देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एण्ड टीव्हीने कौटुंबिक मनोरंजनामध्ये अग्रगण्य म्हणून दर्जा स्थापित केला आहे. नाविन्यता आणि विनोदाची परंपरा कायम राखत एण्ड टीव्ही नवीन काल्पनिक मालिका ‘घरवाली पेडवाली' सादर करण्यास सज्ज आहे. पेनिन्सुला प्रोडक्शन्सद्वारे निर्मित ही नवीन कौटुंबिक विनोदी मालिका अलौकिक शक्तीच्या ट्विस्टसह मनोरंजन देते, ज्यामधून प्रेक्षकांना आणखी एक संस्मरणीय मनोरंजन अनुभव मिळेल.
या मालिकेच्या कथानकामध्ये प्रमुख पात्र आहे पृथ्वी मिश्रा, ज्याला प्रेमाने जीतू म्हणून हाक मारतात. जीतू साधा माणूस आहे, ज्याचे जीवन साधारण आहे. पालकांच्या दोन जोड्यांनी संगोपन केलेल्या जीतूच्या जीवनात दुहेरी गोष्टी आहेत: दोन आई, दोन वडिल, दोन बॉस आणि नशीबातील विलक्षण ट्विस्ट म्हणजे दोन पत्नी, ज्यामुळे तो एकच विवाह आणि समर्पित पत्नी असण्याचे स्वप्न पाहतो. पण नशीबामध्ये त्याच्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवलेले आहे. मोहक व मॉडर्न सावीसोबत विवाह करणार असताना एक अनपेक्षित ज्योतिषीय गुंतागूंत जीतूला एका पवित्र वृक्षाशी प्रतीकात्मक विवाह करण्यास भाग पाडते. या विधीपासून सुरू होणारी गोष्ट लवकरच विचित्रतेत बदलते, जेथे त्या वृक्षामधून लतिका नावाची आत्मा प्रकट होते, जी स्वतःला जीतूची योग्य पत्नी मानते. यासह त्याचे एकेकाळचे साधे स्वप्न दुहेरी दुविधेत बदलते - एक घरवाली आणि एक पेडवाली.
खरी पत्नी आणि अलौकिक वधू यांच्यात अडकलेला जीतू एक नाही तर दोन वैवाहिक जीवनात अडकतो, जो त्याच्या आयुष्यातील ‘दोन' या वारंवार येणाऱ्या थीमशी पूर्णपणे सुसंगत आहे. यानंतर दोन पत्नींमधील धमाल रस्सीखेच सुरू होते, ज्यामुळे त्याचे जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते आणि दररोज हसवून-हसवून लोटपोट करणारे, गोंधळयुक्त क्षण निर्माण होतात, ज्यासह प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुहेरी डोस मिळणार आहे.
मालिका ‘घरवाली पेडवाली' प्रेक्षकांना नवीन अनोख्या संकल्पनेचे मनोरंजन देते, ज्यामध्ये नेहमीचा कौटुंबिक ड्रामा आणि असमकालीन अलौकिक शक्तीचा ट्विस्ट समाविष्ट आहे. यामधून सिद्ध होते की, दुहेरी संकटाचा खरा अर्थ दुप्पट धमाल आहे. या मालिकेसह एण्ड टीव्हीने कौटुंबिक मनोरंजनामधील मर्यादांना दूर करणे सुरू ठेवले आहे आणि विलक्षण, संबंधित व मनेारंजनपूर्ण कन्टेन्टसाठी पसंतीचे गंतव्य म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत आहे.
‘घरवाली पेडवाली’ लवकरच प्रीमियर होणार, फक्त &TV वर!
