टेलिव्हिजनवरील नायिका अनिता हसानंदानी आणि ऐश्वर्या खरे सामिल झाल्या ‘छोरीयां चली गाँव’मध्ये
भारतीय सांस्कृतिक समृद्धी आणि भावनिक खोलीचे प्रतिबिंब असलेले क्रांतिकारी नॉन-फिक्शन फॉरमॅट्स सादर करण्याच्या आपल्या परंपरेला पुढे नेत, झी टीव्ही आता घेऊन येत आहे एक अत्यंत वेगळा आणि ताजातवाना रिअॅलिटी शो — छोरियां चली गाँव. हा शो “इंडिया” आणि “भारत” यांच्यातील दरी भरून काढतो, कारण यात 11 प्रसिद्ध स्वतंत्र महिलांना त्यांच्या जलदगती, लक्झरीशिवाय शहरी जीवनशैलीपासून दूर जाऊन 60 हून अधिक दिवस एका ग्रामीण भारतीय गावात राहतील. कोणतेही गॅझेट्स, सोयीसुविधा किंवा शॉर्टकट्स न घेता, या सहभागी महिला खऱ्या गावातील कामांमध्ये हातभार लावतील, ग्रामीण जीवनशैलीचा स्वीकार करतील आणि गावातल्या ज्ञानात स्वतःला बुडवून घेतील. ह्या शो ची संकल्पना तीन आधारस्तंभांवर आधारलेली आहे – ग्रामीण जीवनात टिकून राहणे आणि जुळवून घेणे, सांस्कृतिकदृष्ट्या समरस होणे आणि भावनिक विकास आणि स्पर्धा व सामाजिक धोरण. छोरियां चली गाँव हा शो जितका भावनांनी भारलेला आहे, तितकाच तो सामाजिकदृष्ट्या अंतर्मुख करणारा ठरणार आहे.
या मनःस्पर्शी प्रवासाचे मार्गदर्शन करणार आहे रणविजय सिंघा, जो या शोमध्ये होस्ट, मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत अशा तीन भूमिका पार पाडणार आहे. तो या महिलांना या परिवर्तनशील अनुभवातून वाट काढायला मदत करणार आहे. आता या प्रवासात आणखी आकर्षण आणि झळाळीची भर घालण्यासाठी येत आहेत भारतीय टेलिव्हिजनमधील दोन अत्यंत लोकप्रिय चेहेरे — अनीता हसानंदानी आणि ऐश्वर्या खरे. त्यांचI बिनधास्त स्क्रीन उपस्थिती आणि प्रेक्षकांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे, या दोघी अभिनेत्री त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून ग्रामीण जीवनाच्या खर्या स्वरूपात पाऊल ठेवण्यास तयार आहेत. हा धाडसी निर्णय केवळ झगमगाट मागे ठेवण्यापुरता मर्यादित नाही — तर तो स्वतःशी पुन्हा नाते जोडण्याचा आणि जीवनातील साध्या पण अर्थपूर्ण सत्यांना नव्याने शोधण्याचा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे.
अनिता हसानंदानी म्हणाली, “या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं काम केल्यानंतर मी नेहमीच अशा प्रोजेक्ट्सच्या शोधात असते जे मला केवळ सर्जनशील दृष्टिकोनातूनच नाही, तर वैयक्तिक पातळीवरही आव्हान देतात — आणि ‘छोरियां चली गाँव’ अगदी तसाच एक अनुभव वाटतो. मी कायम एक शहरातली मुलगी राहिले आहे, पण ग्रामीण भारतातील महिलांची ताकद, सहनशक्ती आणि त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व मला मनापासून आवडले आहे. हा शो मला पुन्हा आपल्या भारतीय मुळांशी जोडण्याची, एक साधे, जमिनीवरचे जीवन जगण्याची आणि स्वतःलाच अशा प्रकारे आव्हान देण्याची संधी देतो, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. सगळ्यात कठीण भाग मात्र माझ्या लहानग्यापासून दूर राहणे असेल. आई म्हणून प्रत्येक क्षणाची ताटातूट मनाला जखडून टाकते, पण त्याच वेळी मला असेही वाटते की त्याने हे बघणे महत्त्वाचे आहे की त्याची आई नवनवीन अनुभवांना सामोरी जाते, त्यांना स्वीकारते. या प्रवासात इतर अद्भुत 'छोरियां'सोबत जुळवून घेण्याची मला विशेष उत्सुकता आहे. आपण सगळ्याजणी खूप वेगळ्या आहोत, पण तरीही आपल्याला एकत्र बांधणारी गोष्ट म्हणजे हे धाडस — या अनुभवात उडी घेण्याचे. हा प्रवास सुंदर, भावनांनी भरलेला असेल आणि मला खरंच वाटतं, मी यासाठी तयार आहे."
ऐश्वर्या खरे म्हणाली, "जेव्हा मी ‘छोरियां चली गाँव’ या शोच्या संकल्पनेबद्दल पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मी लगेचच या शोच्या आत्म्याशी जोडले गेले. रोजच्या आयुष्यात असे फार क्वचित घडते की तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायची, सेट्सपासून दूर, प्रकाशझोतातून बाहेर जाऊन पूर्णपणे वेगळे आयुष्य जगायची संधी मिळते. ग्रामीण पार्श्वभूमी, तिथले खरेखुरे लोक, आणि अशा जीवनशैलीशी जुळवून घेण्याचे आव्हान — हे सगळे मला खूपच रोमांचक वाटले. आजपर्यंत लोकांनी मला 'लक्ष्मी' म्हणून ओळखले आणि प्रेम दिले, पण ही पहिली वेळ असेल जेव्हा मी ‘ऐश्वर्या’ म्हणून दिसणार आहे — खर्या अर्थाने खरी — आणि स्वतःमधल्या अशा बाजूंना शोधणार आहे, ज्या आजवर मीही कधी पाहिल्या नव्हत्या. मला शिकण्याची, जुने विसरण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची उत्सुकता आहे. हा प्रवास निखळ भावनांनी भरलेला आणि अतिशय सशक्त करणारा असणार आहे."
‘छोरियां चली गाँव’ चा लवकरच प्रीमियर होणार असून, प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक प्रभावी आणि भावनिक प्रवास — स्वतःच्या शोधाचा, धैर्याचा, आणि समुदायभावनेचा. या शोमध्ये तुम्ही पाहणार आहात 11 प्रेरणादायी महिला, ज्या गावातल्या साध्या पण कणखर जीवनशैलीला स्वीकारत धाडस, कोमलता आणि वैयक्तिक परिवर्तन यांचा विलक्षण मिलाफ अनुभवतात. गावातल्या जीवनाची खडतरता आणि त्यातील सहजता स्वीकारताना, त्या शोधतील नव्याने स्वतःला — एक असा प्रवास, जो प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाईल.
तेव्हा पाहायला विसरू नका झी टीव्हीवर, ‘छोरीयां चली गाँव’ लवकरच प्रीमिअर होत आहे झी टीव्हीवर!