जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी लाँच केलं हंटर २ – टुटेगा नही तोडेगा या अमेझॉन एमएक्स प्लेयरच्या अॅक्शन सीरीजचं ट्रेलर, या धमाकेदार कार्यक्रमात टायगर श्रॉफ यांची सरप्राइज एंटी
मुंबई, भारत १८ जुलै २०२५ – अमेझॉन एमएक्स प्लेयर या अमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज हंटर २ – टुटेगा नही तोडेगा या सीरीजचं ऑफिशियल ट्रेलर लाँच केलं. मुंबईत झालेल्या एका धमाकेदार कार्यक्रमात सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांनी या शोचं भव्य पोस्टर फाडत बाहेर एंट्री घेतली. ट्रेलर लाँचच्या या कार्यक्रमात टायगर श्रॉफ यांनीही सरप्राइज एंट्री घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या आगामी सीरीजबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ते उपस्थित होते.
या ट्रेलरमध्ये सीरीजच्या पुढच्या गोष्टीची झलक पाहायला मिळाली. जबरदस्त अॅक्शन सिक्वेन्स, तीव्र भावना आणि हंटर व सेल्समॅन यांच्यात होणारा फेस ऑफ ट्रेलरमध्ये दिसतो. लाँचप्रसंगी सीरीजमधले इतर कलाकारही उपस्थित होते व त्यात अनुषा दांडेकर, बरखा बिश्ट, अनंग देसाई, प्रमोद पाठक आणि मॅझेल व्यास यांचा समावेश होता. धिमन आणि अलोक बात्रा यांचे दिग्दर्शन व युडली फिल्म्स या सारेगामा इंडियाच्या फिल्म डिव्हिजनची निर्मिती असलेल्या हंटर २ – टुटेगा नही तोडेगाचे स्ट्रीमिंग २४ जुलैपासून अमेझॉन एमएक्सप्लेयवर मोफत होणार आहे.
हंटर- टुटेगा नही तोडेगाच्या दुसऱ्या सीझनविषयी अमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘हंटर २ – टुटेगा नही तोडेगा या सीझनमध्ये आम्ही यातली गोष्ट नव्या पातळीवर नेली आहे. यातल्या व्यक्तीरेखा सखोल भावनिक पातळीवरून अॅक्शन आणि जागतिक पातळीवर जाताना दिसतील. सुनील शेट्टी यांचं पुनरागमन व जॅकी श्रॉफ यांच्या एंट्रीने गोष्ट पूर्णपणे नव्या उंचीवर जाणार असून दोघांचा फेसऑफ खासगी आणि तितकाच शक्तीशाली असेल. अमेझॉन एमएक्स प्लेयरमध्ये आम्ही भावनिक पातळीवर आपल्याशा वाटणाऱ्या आणि अनोखा प्रेक्षणीय अनुभव देणाऱ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत असतो.’
हंटर – टुटेगा नही तोडेगाच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादाने आम्हाला प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अॅक्शन आवडते हे लक्षात आलं. सुनील शेट्टी यांचं विक्रमच्या भूमिकेतलं पुनरागमन आणि जॅकी श्रॉफ यांचा वैशिष्ट्यपूर्ण सेल्समन यांच्यासह सीझन २ मध्ये कथेला नवा आयाम मिळाला आहे. सारेगामा आणि युडली फिल्म्समध्ये आम्ही आजच्या प्रेक्षकांना आपलेसे वाटतील असे सिनेमॅटिक अनुभव तयार करण्यासाठी उत्सुक आहोत. अमेझॉन एमएक्स प्लेयरमुळे आम्हाला मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणं शक्य झालं,’ असं सारेगामा इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष सिद्धार्थ आनंद कुमार म्हणाले.
ट्रेलर लाँच कार्यक्रमात या सीरीजमध्ये परतल्याचा आनंद व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाले, ‘हंटर २ – टुटेगा नही तोडेगामध्ये विक्रमचा भूतकाळ, त्याच्या वेदना आणि त्याची प्रेरणा आणखी खोलवर जाणून घेता येईल. हा ट्रेलर फक्त एक झलक आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, यातली अॅक्शन. त्यात फक्त बंदुका आणि पाठलाग नाहीये, तर ती भावनिक पातळीवर करण्यात आली आहे. भावनांच्या दबावामुळे यातला प्रत्येक सीन आणखी खास झाला आहे. चाहते व मीडियासमोर ट्रेलर लाँच करण्यातून आम्हाला प्रेक्षक या सीरीजच्या पुढच्या प्रकरणासाठी उत्सुक असल्याचं ठळकपणे दिसून आलं.’
आपली व्यक्तीरेखा आणि या बहुप्रृतीक्षीत सीझनविषयी जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘हंटर २ – टुटेगा नही तोडेगा करताना खूप मजा आली. या सीरीजचं आपलं एक वेगळं विश्व आहे आणि त्यात सेल्समन प्रवेश करतो व उलथापालथ घडवतो. त्याला नडणं हे आगीशी खेळण्यासारखं आहे. तो थंड आणि तरीही खुनशी आहे. ट्रेलर लाँच झालाय भिडू! सीरीजचा आनंद घेण्याची वेळ आली आहे.’
२४ जुलै २०२५ पासून अमेझॉन एमएक्स प्लेयरवर या पॉवर- पॅक्ड सीरीजचा आनंद घ्या, तो ही मोफत. मोबाइल व कनेक्टेड टीव्हीवर एमएक्स प्लेयर अॅप, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, एयरटेल एक्स्ट्रीमवर उपलब्ध.
ट्रेलर लिंक: https://youtu.be/eaLU-KsLcRE