‘एकटे अपूर्ण. पण एकत्र येताच परिपूर्ण!’ – वायआरएफ आणि मोहित सूरी घेऊन येत आहेत सैयारा मधील तिसर प्रेमगीत ‘तुम हो तो’, विशाल मिश्राच्या आवाजात
यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांची आगामी प्रेमकहाणी सैयारा सध्या इंटरनेटवर सर्वाधिक चर्चेत असलेला म्युझिक अल्बम ठरत आहे. याआधीच्या हिट टायटल ट्रॅक सैयारा आणि हृदयस्पर्शी बर्बाद नंतर, आता तिसरं गाणं तुम हो तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. हे गीत सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल असणाऱ्या गायक विशाल मिश्रा ने गायले आहे.
या गाण्याचा मूड स्पष्ट करताना मेकर्सनी एक इमोशनल फोटो शेअर केला आणि लिहिलं –
‘एकटे अपूर्ण. पण एकत्र येताच परिपूर्ण. ही कथा तुमचं हृदय हलवून टाकेल... ❤️’
https://www.instagram.com/p/DK9lB6PIp46/?igsh=ZzExN2RoY2E4ZHhm
सैयारा ही एका मुलगा-मुलीची अद्वितीय प्रेमकहाणी आहे, जी प्रेमावरचा विश्वास पुन्हा जागवेल आणि तुमच्या मनात आनंद निर्माण करेल.
टीझर रिलीजपासूनच, सैयारा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. वायआरएफ आणि मोहित सूरी यांचा प्रेमकथांचा वारसा या नव्या चित्रपटातही अनुभवायला मिळणार आहे – यावेळी दोन्ही नवोदित कलाकारांसह.
'सैयारा' हे नाव सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचा अर्थ आहे – एक भटकता तारा, जो आपल्या तेजाने वाट दाखवतो, पण स्वतः मात्र कधीच पकडता येत नाही.
या चित्रपटातून आहान पांडे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि त्याच्या जोडीला आहे अनीत पड्डा, तिने बिग गर्ल्स डोंट क्राई या मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
सैयारा 18 जुलै 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
वायआरएफ च्या 50 वर्षांच्या इतिहासात यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी अनेक अजरामर प्रेमकथा दिल्या आहेत. आणि मोहित सूरी, ज्यांनी आशिकी 2, मलंग, एक व्हिलन अशा अनेक हिट प्रेमकथा दिग्दर्शित केल्या आहेत, तेही या चित्रपटातून आणखी एक स्पेशल लव्ह स्टोरी प्रेक्षकांसमोर आणत आहेत.