Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"वॉर २ मध्ये ऋतिकची मॅग्नेटिक उपस्थिती आणखी उठून दिसावी यासाठी मेहनत घेतली आहे!"

 "वॉर २  मध्ये ऋतिकची मॅग्नेटिक उपस्थिती आणखी उठून दिसावी यासाठी मेहनत घेतली आहे!" – अनाइता श्रॉफ अदजानिया यांचा खुलासा




बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार ऋतिक रोशन पुन्हा एकदा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील आपल्या कबीर या सुपर-स्पाय च्या भूमिकेत वॉर २ मध्ये दिसणार आहे. टीझरमध्ये त्याच्या स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण लूकने सोशल मीडियावर प्रचंड धूम उडवली आहे.


चित्रपटाची ची कॉस्ट्युम डिझायनर अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी सांगितले की, वॉर २  मध्ये ऋतिकचा करिष्मा अधिक प्रभावी आणि खोलगट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


अनाइता म्हणते ,"धूम 2, बैंग बैंग आणि अनेक जाहिरातींनंतर वॉर हा एक वेगळा टप्पा होता. आपण 'ग्रंज' लूकपासून दूर जाऊन एक अधिक क्लीन, शार्प आणि तरीही धाडसी लूक तयार केला—जणू सुपरहिरो साध्या कपड्यांतच. निर्धार असलेला पण सहज वाटणारा लूक."


त्या पुढे म्हणतात "वॉर २  मध्ये कबीर या पात्रामध्ये अधिक गडद आणि भावनिक बाजू उलगडण्याचा प्रयत्न आहे. फॅब्रिक्स अधिक साधे, वापरलेले वाटणारे, थोडे बिनदिक्कत, पण तरीही ती धार त्याच्या व्यक्तिमत्त्वातून स्पष्टपणे दिसते."


अनाइता सांगते , "वॉर मध्ये जे यशस्वी ठरले—जसं त्याचा कटिंग लूक, करिष्मा—ते सगळं घेऊन त्यावर आणखी काम केलं आहे. लूक, अटिट्यूड आणि संयम यांचं सुंदर मिश्रणच वॉर २  साठी कबीरला खास बनवतं."



आदित्य चोप्रा यांच्या निर्मितीखाली आणि अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला वॉर २  मध्ये ऋतिकसमोर असतील साऊथचे सुपरस्टार एनटीआर , जो  'मॅन ऑफ द मासेस' म्हणून प्रसिद्ध आहे.



फिल्ममध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

वॉर २ , १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.