Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’*

 *महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’* 

 पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



 *मुंबई 23 मे, २०२५ :* कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी देवीने एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केले. “ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे,” या वाक्यातून आदिशक्तीने एक संकेत दिला होता – सत्य आणि धर्माच्या विजयासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या कवडीच्या माध्यमातून देवीचे सर्वव्यापी आणि सूक्ष्म स्वरूप प्रकट झाले आहे आणि आता हीच देवी एका नव्या रूपात दर्शन देणार आहे. आणि ते म्हणजे आई तुळजाभवानी बाळरूपात प्रकट होणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचं बाळरूप दर्शन हे एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. जिथे लढाई फक्त बाह्य असुरांविरुद्ध नव्हे, तर अंतर्मनातल्या आसुरी वृत्तीविरुद्ध सुरू होते. हा गूढ, भावनिक आणि अध्यात्मिक टप्पा अनुभवण्यासाठी पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 




जनकबाबा आणि गंगाई हे देवीचे निस्सीम भक्त असलेले जोडपे एका गूढ आवाजाच्या दिशेने जातात आणि समोर दिसतात फुत्कार करणारे अनेक साप. या धक्कादायक दृश्यात, अचानक साप बाजूला होतात आणि एका टोपलीत हसणारं बाळ दिसते. हाच तो क्षण आहे जिथे देवीचा बाळरूपातील अवतार पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येतो.  “महिषासुराच्या विनाशासाठी आम्ही आता नव्या रूपात आलो आणि आता सुरु होणार नवीन अध्याय,” हा देवीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज या क्षणाचं दैवीत्व अधोरेखित करतो. बाळरूप हे केवळ निरागसतेचं नव्हे तर साक्षात शक्तीचं प्रतीक आहे एक असुरविनाशासाठी आवश्यक असलेलं नवसृजन. ही अनुभूती, त्यामागचं आध्यात्मिक सूत्र, आणि देवीचा बालरूपी प्रवास प्रेक्षकांना कथानकाच्या गाभ्याशी जोडून ठेवतो. 


तेव्हा पुढे मालिकेत देवी बाळरूपात कशी असुर वृत्तीशी लढणार ? महिषासुर आई तुळजाभवानीला शोधू शकेल का ? जाणून घेण्यासाठी पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.