*‘सितारे जमीन पर’मधील ऋषी शहानी उर्फ ‘शर्माजी’ ज्यांच्या गोष्टी पाहून व्हाल लोटपोट*
आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ या बहुप्रतिक्षित आणि हृदयस्पर्शी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’च्या स्पिरिचुअल सिक्वल असलेल्या या चित्रपटाबाबत मेकर्स सातत्याने नवनवीन गोष्टी शेअर करत आहेत. आता त्यांनी या चित्रपटातील एक खास कलाकार ऋषी शहानी उर्फ 'शर्माजी' यांचं मन जिंकणारं इंट्रोडक्शन प्रेक्षकांसमोर आणलं आहे.
सेटवर आपल्या प्रसन्न, उत्साही आणि दिलखुलास स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकणारे ऋषी, आमिर खानसोबत डान्स, योगा, मस्ती आणि शूटींगच्या वेळी एक विशेष ऊर्जेचा अनुभव देतात. त्यांच्या अजब-जजब बोलण्याच्या स्टाईलमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. विशेष म्हणजे, १९९९ मध्ये ऋषी शहानी यांनी स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड गेम्समध्ये भारतासाठी स्विमिंगमध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल्स जिंकले आहेत. हे त्यांच्या प्रतिभेचं आणि ध्येयवेडेपणाचं मोठं उदाहरण आहे.
‘शर्माजी’च्या या खास ओळखीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करत मेकर्स म्हणतात, "शर्माजी काहीही बोलोत... तुमचं हसू थांबणार नाही. बस, हेच आहे त्यांचं जादू!"* 🥰
📽️ व्हिडीओ लिंक: [Instagram व्हिडीओ](https://www.instagram.com/reel/DJ04WKIovkf/?igsh=czE1MTk5dDA2NXUw)
२० जून २०२५ पासून ‘सितारे जमीन पर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आमिर खान प्रोडक्शन्स अभिमानाने सादर करत आहे १० प्रेरणादायी कलाकार:- अरूष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या ट्रेंड-ब्रेकींग ब्लॉकबस्टर देणारे आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. आता ते आमिर खान प्रोडक्शन्ससोबत या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये परतले आहेत.
चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकणार असून, याचे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे. पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका.