Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*रश्मिका मंदानाची नवी मैत्री ग्लोबल लेव्हलवर चर्चेत; ‘स्टिच’सोबतची अनोखी बॉन्डिंग चाहत्यांच्या मनात करतेय घर*

 *रश्मिका मंदानाची नवी मैत्री ग्लोबल लेव्हलवर चर्चेत; ‘स्टिच’सोबतची अनोखी बॉन्डिंग चाहत्यांच्या मनात करतेय घर* 


देश-विदेशात आपल्या अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी कारण आहे तिचा नवा खास 'BFF' — आणि तो कोणी साधासुधा नाही, तर वॉल्ट डिज्नी स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित समर एंटरटेनमेंट फिल्म ‘लिलो अँड स्टिच’मधील शरारती आणि गोंडस स्टिच!


रश्मिका ही तिच्या मजेशीर भूमिकांसाठी, खास अंदाजासाठी आणि पॉप-कल्चरप्रती असलेल्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती स्टिचसोबत धमाल मस्ती करताना दिसते आणि त्याने सोशल मीडियावर एकच धूम माजवली आहे.



👉 व्हिडिओ बघा: [Instagram लिंक](https://www.instagram.com/reel/DJ0zkMAzhVZ/?igsh=ajNrN3BiNmtmdXM5)


रश्मिका म्हणते, "इतकं क्युट की सांभाळणं कठीण आणि इतकं क्रेझी की दुर्लक्षित करणं अशक्य! माझा बेस्ट फ्रेंड मला वेडसर आणि आनंदाने भरून टाकतोय!

प्लीज सांगा की मीच एकटी नाहीये जी याच्या प्रेमात पडली आहे!"तिच्या या भन्नाट पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्टिचसोबत तिची ही अनोखी मैत्री एका नव्या आणि गोड नात्याची सुरुवात दर्शवते.


फिल्मबद्दल थोडक्यात

‘लिलो अँड स्टिच’ ही एक सुंदर, मजेशीर आणि भावनिक गोष्ट आहे — एका एकट्या हवाईयन मुलीची आणि एका पळून आलेल्या एलियनची, जो तिच्या तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. डिज्नीच्या या आयकॉनिक अ‍ॅनिमेटेड क्लासिकचालाईव्ह-ऍक्शन रिमेक आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. २३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून तो इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.