नेहा पेंडसेचा कान्समधील डेब्यू, काळ्या पोशाखात मोहक अवतार!
प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री नेहा पेंडसे हिने 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला डेब्यू केला आणि तिच्या चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवरील उल्लेखनीय कारकिर्दीतील एक अभिमानास्पद टप्पा गाठला. May I Come In Madam?, भाभीजी घर पर हैं! आणि प्रशंसित मराठी चित्रपट June मधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी नेहा, आता भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी आणि सतत प्रगती करणारी अभिनेत्री म्हणून कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली आहे.
यंदा, बीएमडब्ल्यूने खास आमंत्रण देत नेहाला त्यांच्या कान्समधील सेलिब्रेशनचा भाग बनवले, जिथे जगभरातील सृजनशील आवाजांचा सन्मान करण्यात येतो.
चोपार्डच्या खास Bollywood Evening साठी नेहाने डिझायनर मनीष घरत यांनी डिझाइन केलेला काळ्या रंगाचा टेलर्ड गाउन परिधान केला होता – एक कालातीत आणि क्लासिक लुक, ज्यामध्ये शिस्तबद्ध एलिगन्स आणि हळुवार नाट्यमयता यांचा सुंदर मिलाफ होता. तिच्या या लुकमध्ये आधुनिक सौंदर्य आणि सिनेमॅटिक नॉस्टॅल्जिया यांचा समतोल दिसून आला, जो तिच्या कलाकार म्हणून घडत जाणाऱ्या प्रवासाशी सुसंगत होता.
कान्स डेब्यूबाबत बोलताना नेहा म्हणाली,
"कान्समध्ये असणे हे खरंच स्वप्नवत आहे. बीएमडब्ल्यूचे मन:पूर्वक आभार मानते, ज्यांनी माझ्या प्रवासाला मान्यता दिली आणि विविध सर्जनशील वाटांवर चालणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले. या क्षणी रेड कार्पेटवर चालणे म्हणजे फक्त फॅशन आणि सिनेमा यांचाच नव्हे, तर वैयक्तिकतेचा, प्रगतीचा आणि जागतिक कथाकथनाचा उत्सव आहे. टेलिव्हिजन, प्रादेशिक चित्रपटसृष्टी आणि इंडिपेंडंट प्रोजेक्ट्सचा अनुभव घेणाऱ्या माझ्यासाठी, हा क्षण आतापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सुंदर पावती आहे — आणि एक आठवण की हा प्रवास अजून संपलेला नाही, तर पुढे चालूच आहे.”