Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*१७ मिलियन हुन अधिक 'देमाणूस - मधला अध्याय' प्रोमोचे वियुव्हीस गेले आहेत - किरण गायकवाड*

*१७ मिलियन हुन अधिक 'देमाणूस - मधला अध्याय' प्रोमोचे वियुव्हीस गेले आहेत -  किरण गायकवाड*



झी मराठीवर *‘देवमाणूस‘ मधला अध्याय’* या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या ह्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार?  यात कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा  सुरू झाली.  मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे आणि आपल्याला मधला अध्यायसाठी कॉल आला तेव्हा काय म्हणणं होत किरणचे जाणून घेऊया. "जेव्हा मला कळलेलं  मी   परत एखादा  देवमाणूस  करत आहात, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार हा आला की आता काय दाखवणार,कसं होणार , काय होणार पण माझा लेखक आणि आमच्या निर्मिती संवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि झी मराठी जो पर्यंत १००% चांगलं असल्याशिवाय  काही करत नाही तर मला कुतुहूल होत.




 इतकी कमाल गोष्ट तयार केली आहे  जिथे पहिला सीजन संपला आणि दुसरा सीजन सुरु झाला त्याच्या मध्ये देवमाणूस कुठे होता आणि काय करत होता याच्यावर हे कथानक पेरलं आहे देवमाणूस- मधला अध्याय मध्ये. जेव्हा प्रोमो आला लोकांचा प्रतिसाद खतरनाक मिळाला. देवमाणूस- मधला अध्याय म्हणजे काय आहे कारण मला फाशी दिली गेली होती. तर डॉक्टर अजित कुमार देव कोण असणार तो आहे कि नाही मुळात पर्वात किरण गायकवाड आहे कि नाही हे सर्व प्रश्न प्रेक्षकांकडून आले होते. त्यानंतर जो पहिला लुक आला जो वेगळा होता. आमच्या दुसऱ्या प्रोमोला १७ मिलियन हुन अधिक वियुव्हीस गेले आहेत.  प्रोमोला जो प्रतिसाद आला तो पाहून थोडं दडपण आलय आणि जबाबदारी वाढली आहे कारण प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा जोड्ल्या गेल्या आहेत. देवमाणूस - मधला  अध्याय  मध्ये प्रेक्षकांना एकदम भन्नाट गोष्ट पाहायला मिळणार आहे. एकसे बढकर एक पात्र असणार आहेत. तुम्ही यात रमून जाल. यावेळी मी एका टेलरच्या भूमिकेत दिसणार आणि सातारी भाषा बोलणार आहे. माधव अभ्यंकर, ज्यांनी अण्णा नाईक ही भूमिका गाजवली त्यांना देवमाणूस-मधला अध्याय मध्ये एक वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. इतर सर्व कलाकार हे ताक्तीचे आहेत. स्वप्नील गांगुर्डे आणि  विशाल कदमच लेखन आहे , राजू सर दिग्दर्शक आहे आणि यांनी सर्व छान जमवून आणलंय आणि मी उत्सुक आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेसाठी जेव्हा ते मालिका बघतील."


*तेव्हा पाहायला विसरू नका देवमाणूस - मधला अध्याय २ जूनपासून दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.