हिंदी मराठी कलाविश्व गाजवणारी नेहा पेंडसे पोहचली कान्स फेस्टिवलला !
नेहा पेंडसेचा खास कान्स डेब्यू !
ग्लॅमर आणि नेहाच्या कान्स रेड कार्पेट वर खास अदा !
मराठी सोबतीने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे ! अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे.
मराठीबरोबरच नेहाने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. मे आय कम इन मॅडम? या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पुढे नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती आणि नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली होती त्या नंतर नेहा काय नवीन भूमिका साकारणार कोणत्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार या साठी चाहते देखील तितकेच उत्सुक होते पण आता प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नेहा सातासमुद्रापार असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये डेब्यू करणार आहे.
नेहा ने कान्समध्ये डेब्यू केला आणि तिने या फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूक आता समोर आला असून तिच्या या खास आऊटफिटमध्ये ती सुंद दिसत आहे. नेहाचा हा पहिला कान्स लूक असून अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लूक्स मध्ये ती दिसणार आहे.
कान्स बद्दल बोलताना नेहा सांगते " प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असत आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता पण सोबतीने तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरत ने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली आणि हा लूक उत्तम बनवला आहे. कान्स साठीचा लूक हा मला शार्प आणि तितकाच ताकदीचा असावं असं वाटतं होत. कान्स डेब्यू करताना थोडी धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता तिथल्या गोष्टी छान एन्जॉय करायचा हेच ठरवून मी इकडे आली आहे.
नेहाने आजवर तिच्या प्रत्येक फॅशन स्टेटमेंट ने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे आणि कान्स मधल्या या तिच्या लूक च देखील तितकच तोंडभरून कौतुक प्रेक्षक करताना दिसतात.