सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी "चिडिया" या हिंदी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग
आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला "चिडिया" हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते.
की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण या चित्रपटातून दाखविण्यात आले असून अतिशय उत्तम असा चित्रपट झाल्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी सांगितले तसेच चित्रपट सगळ्यांनी चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान करुन चित्रपटाच्या यशसाठी टीमला शुभेच्छा दिल्या.
"चिडिया" ही मुंबईच्या चाळीत रचलेली एक सुंदर कथा आहे, जिथे मुले त्यांच्या निरागसतेद्वारे त्यांच्या पात्रांची लवचिकता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्ननशील असतात. हृदयस्पर्शी कथा असलेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला असून आता तो संपूर्ण भारतातील लोकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अकबर हुसैनी यांनी आवर्जून नमूद केले.
या चित्रपटात विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे, तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करणार आहे.