शुभचिंतक पोस्टर वरच्या स्वप्नीलच्या लूक ने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष !
स्वप्नीलच्या या लूक ने चाहत्यांना शुभचिंतक ची उत्सुकता !
वर्षाच्या सुरुवातीपासून अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी हा अनेक प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे आणि अश्यातच स्वप्नील त्याचा चाहत्यांना वेगवेगळ्या भूमिकेत देखील दिसतोय. स्वप्नील सध्या सुशीला सुजीत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला तरी त्याचा आगमी गुजराती चित्रपटाच्या पोस्टर मुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
एकीकडे स्वप्नील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असला तरी त्याचा कामाचा वाढता आलेख हा कायम उंचावताना दिसतोय. निर्माता आणि अभिनेता या दुहेरी भूमिका साकारून तो आता बहुभाषिक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय.
काही दिवसांपूर्वी स्वप्नील ने त्याचा पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली आणि अनेक दमदार कलाकारांच्या सोबत तो यात काम करताना दिसणार असल्याचं देखील कळतंय. " शुभचिंतक " हा स्वप्नील चा पहिला गुजराती चित्रपट असला तरी सुरुवाती पासून तो चर्चेत आहे. मराठी चित्रपट सृष्टी गाजवल्या नंतर आता स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार यात शंका नाही.
शुभचिंतक च्या नव्या पोस्टर मध्ये स्वप्नीलचा डॅशिंग आणि तितकाच करारी लूक बघायला मिळतोय. स्वप्नील त्याचा आधीच्या भूमिका पेक्षा यात नक्कीच काहीतरी वेगळी आणि तितकीच खास भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे.
या सगळया बद्दल बोलताना स्वप्नील सांगतो " गेले काही दिवस प्रमोशन मध्ये व्यस्त असताना एकीकडे शुभचिंतक साठी देखील मी खूप उत्सुक आहे. बॅक टू बॅक कामाच्या व्यापात व्यस्त राहण हे कोणत्याही कलाकाराला आवडतं ! थोड्या दिवसात शुभचिंतकच प्रमोशन सुरू होणार आहे आणि हा गुजराती चित्रपट असल्याने नव्या भाषेत काम करण्याची गंमत या निमित्ताने अनुभवता आली आहे. सुशीला सुजीत नंतर लगेच नव्या चित्रपटा मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मी देखील वाट बघतोय"
मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारणारा स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात देखील तेवढ्याच दमदार पद्धतीने काम करणार यात शंका नाही !