*मैत्रीची कहाणी, स्वप्नांचा पाठलाग – ‘आम्ही बटरफ्लाय’चा वर्ल्ड प्रीमियर सुरू…*
*मुंबई 16 एप्रिल 2025 -* चार मित्र, एक अतूट नातं आणि स्वप्नांच्या मागे धावत असलेली एक विलक्षण गोष्ट – ‘आम्ही बटरफ्लाय’ हा चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ११ एप्रिल रोजी झाला. दिग्दर्शक अनिकेत लिमजे आणि श्रीकुमार शिरस यांच्या सर्जनशील दृष्टीकोनातून साकारलेली ही कथा प्रेक्षकांना बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या प्रवासात घेऊन जाते.
चित्रपटाचे केंद्रस्थानी आहेत – शिवा, रणजी, शाहरुख आणि रामन – हे चार जिवलग मित्र. त्यांच्या नात्यातील निरागसता, संघर्ष, प्रेम, आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींमधून त्यांच्या मैत्रीची साखळी अधिकाधिक घट्ट होत जाते. जीवनातील विविध टप्प्यांवर त्यांच्या स्वप्नांची दिशा बदलते, पण त्यांच्या नात्याचे बंध मात्र अधिक गहिरे होत जातात.
‘आम्ही बटरफ्लाय’ ही केवळ चार मित्रांची कथा नाही, तर ही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या त्या खास मैत्रीची आठवण करून देणारी भावना – जिच्यासोबत आपण मोठे होतो, शिकतो आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार करतो.
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने एप्रिल महिन्यात आपल्या प्रेक्षकांसाठी एक खास मनोरंजनमालिका उभारली आहे. सुपरहिट मराठी चित्रपट, दर्जेदार ओरिजिनल वेब सिरीज, तसेच मराठीत डब केलेले साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट यांचा समावेश यामध्ये आहे. उन्हाळ्याच्या या दिवसांत प्रेक्षकांना घरबसल्या दर्जेदार कंटेंटचा अनुभव घेता यावा, यासाठी अल्ट्रा झकास मराठी एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म ठरतो आहे.
‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने जरी अनेकजण एकमेकांना फसवतात, तरी अल्ट्रा झकास मराठी मात्र देते आहे १००% खरे, दर्जेदार आणि झकास मनोरंजन – याची हमी!
‘आम्ही बटरफ्लाय’सारखा हृदयस्पर्शी आणि भावनिक चित्रपट तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या नात्याला नव्याने उलगडणारा ठरेल. ही कथा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात स्थान मिळवेल, याची खात्री आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "प्रेक्षकांसाठी नेहमी काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच एप्रिल महिन्यात, थरारक रहस्ये, हृदयस्पर्शी कथा आणि दमदार ॲक्शनने भरलेले चित्रपट आणि वेब सिरीज तुमच्या भेटीला येणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सिरीज केवळ मनोरंजन देणाऱ्या नाहीत, तर त्यातून एक प्रेरणादायक संदेशही मिळेल. कारण अल्ट्रा झकास मराठी म्हणजे तुमच्या उत्तम मनोरंजनाची १०० % हमी आहे."