सईच्या आगामी लावणीची झलक झाली व्हायरल !
आलेच मी असं म्हणत सईच्या लावणीची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला !
काही दिवसांपासून सई ताम्हणकर चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे ! सई आगामी देवमाणूस चित्रपटात पहिल्यांदा लावणीवर थिरतकाना दिसणार आहे.
सईच्या या लावणीच नाव " आलेच मी" अस असून सोशल मीडिया वर या गाण्याचा टीझर चांगला व्हायरल होताना दिसतोय. सई ला पहिल्यांदा लावणी करताना बघण ही एक पर्वणी तर असणार आहे पण तिच्या लूक्स ने यात देखील लक्ष वेधून घेतलं आहे. नऊवारी साडी आणि सईच्या अनोख्या अदा असलेला आलेच मी चा टीझर चर्चेचा विषय ठरतोय.
नावीन्यपूर्ण भूमिका करणारी सई सध्या जोरदार काम करताना दिसतेय आणि सोबतीला तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच तितक्याच दणक्यात प्रमोशन सुद्धा करतेय. सई ही कायम तिच्या फॅशन आणि वैविध्यपूर्ण भूमिका साठी ओळखली जाते आणि अश्यातच सईची लावणी लक्षवेधी ठरणार यात शंका नाही !