Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन मिळत. सरकारने लक्ष द्यायला हवं – वैशाली सामंत"*

 *"मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन मिळत. सरकारने लक्ष द्यायला हवं – वैशाली सामंत"*


*सावनी रविंद्रच्या पॉडकास्ट मध्ये वैशाली सामंतने केली सरकारकडे मागणी*

*"मराठी सिनेसृष्टीत आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे – वैशाली सामंत"*



आपल्या महाराष्ट्रात टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे.गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची.

 नुकतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखिल दिला आहे.    


नुकतच सावनीच्या या Podcast साठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आल्या होत्या. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. “आपल्या कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव. 



सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देखिल घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.” असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेच आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.