*हंगामा ओटीटी सादर करते 'पर्सनल ट्रेनर', सस्पेन्स आणि षड्यंत्राची कथा*
पर्सनल ट्रेनर, रहस्य, सस्पेन्स आणि मुंबईच्या ग्लॅमरस जिम कल्चरची आकर्षक कथा
*मुंबई, ३० जानेवारी २०२५* - भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म पैकी एक असलेल्या हंगामा आपली नवी मालिका घेऊन सज्ज झाले आहे. हंगामा OTT वर 28 जानेवारी 2025 रोजी त्यांची नवीन "पर्सनल ट्रेनर" ही क्राइम थ्रिलर मालिका प्रदर्शित होणार आहे. यात मुख्य भूमिकेत ब्युटिफुल टिना दत्ता दिसणार आहे. टिनासह यात गुलशन नैन आणि साहिब तग्रा अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
मुंबईच्या उच्चभ्रू जिम संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा फिरते. या मालिकेच्या केंद्रस्थानी नेहा धर्मराजन आहे. जिची भूमिका टिना दत्ता साकारत आहे. ही मालिका महत्त्वाकांक्षा, प्रेम आणि शारीरिक गरजापूर्ण करताना धोकादायक वळणांचा शोध घेते. या कथेत टिना दत्ता नेहा धर्मराजन या विवाहित महिलेच्या मुख्य भूमिकेत आहे, जिचे तिच्या पर्सनल ट्रेनर असलेल्या अनीश सोबत विवाहबाह्य संबंध असतात. अनिशची भूमिका गुलशन नैन यांनी साकारली आहे. एक सीक्रेट लव्हस्टोरी म्हणून सुरू झालेली ही प्रेमकथा अनिशच्या रहस्यमय मृत्यूने संपते. ही मालिका जीममधील सीक्रेट आणि छुपे अजेंडे यांच्या असलेल्या जाळ्यांमुळे प्रत्येकाला संशयाच्या भोवऱ्यात उभे करते.
या शोबद्दल बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, “आमची नवीन क्राईम थ्रिलर मालिका 'पर्सनल ट्रेनर'च्या ही तुम्हाला मालिका त्याच्या असलेल्या ट्विस्ट आणि टर्न्समुळे गुंतवून ठेवले. मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचा शोध यात घेण्यात आला आहे.”
टिना म्हणाली, “नेहा ही भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा सर्वात आव्हानात्मक आहे. कथेतील प्रत्येक ट्विस्टने मला अर्लट ठेवले आणि तिच्या प्रवासाच्या अनेक छटा पाहून मी खूप भावनिक झाले. प्रेक्षकांना ही मालिका नक्की भुरळ पाडेल त्यांच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
गुलशन नैन आपल्या भूमिकेबाबत सांगताना म्हणाले, “पर्सनल ट्रेनर ही एक कथा आहे जी खरोखरच प्रेरणादायी आहे. ही भूमिका मला ऑफर झाल्यावर, पटकथा वाचण्यापूर्वीच मी अमित खन्नाच्या दृष्टिकोनावर सहज विश्वास ठेवला. मी मालिकेच्या विचारशील लेखनाकडे आणि दिग्दर्शनाकडे आकर्षित झालो. मला खात्री आहे की कथेमध्ये असलेल्ी भावनिक प्रामाणिकता प्रेक्षकांवर कायमची छाप सोडेल."
साहिब तग्रा म्हणतात, "पर्सनल ट्रेनर ही एक अशी कथा आहे जी खरोखरच प्रेरणादायी आणि प्रामाणिक आहे, संघर्ष, आकांक्षा आणि नातेसंबंधांच्या वास्तविक जीवनातील थीममध्ये खोलवर जाते. ती आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा शोध घेते. या प्रोजेक्टवर काम करणे हा एक समृद्ध प्रवास होता आणि मला विश्वास आहे की कथेतील भावना आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांशी वैयक्तिक पातळीवर खरोखरच जोडला जाईल."
हंगामा OTT वर 28 जानेवारी 2025 रोजी प्रीमियर झालेला पर्सनल ट्रेनर पाहायला विसरू नका. सर्व भाग पाहण्यासाठी हंगामा ॲप आजच डाउनलोड करा. ही मालिका आता हंगामा आणि भागीदार प्लॅटफॉर्मवर केवळ Tata Play Binge, Watcho, BSNL, PlayboxTV, RailWire Broadband, Airtel Xstream Play, आणि Dor Tv वर प्रवाहित होत आहे.