*'सैराट' फेम तानाजी जलगुंडेच्या नव्या लूकची चर्चा, मोनालिसा बागलसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री!*
*तानाजी जलगुंडेचा श्रीमंत पाटील लूक, मोनालिसाचा सोज्वळ साउथ इंडियन अंदाज – प्रेक्षक उत्सुक!*
*सैराटनंतर तानाजी जलगुंडेचा नवा धमाका – सोशल मीडियावर व्हायरल!*
*साउथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन जोडीचा धमाका – '13 लीला विला' मध्ये तानाजी-मोनालिसाची जोडी!*
सैराट सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदिप ही सगळी पात्र त्यांची स्टाईल त्यांच लूक प्रत्येकाला लक्षात आहे. मात्र यांच सिनेमामधला प्रदिप बनसोडे म्हणजेच आपल्या सगळ्याचा लाडका अभिनेता तानाजी जलगुंडे यांच नवं लूक पाहून तुम्ही हैरान व्हालं. मोनालिसा बागल आणि तानाजी जलगुंडे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. नेहमीच स्क्रीनवर पहिला आवडते त्यांच्या गैस्ट आणि भिरकीट सिनेमातील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आता हीच जोडी आपल्याला आगामी चित्रपट 13 लीला विला ह्या सिनेमात पहिला मिळणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन सिराज अरब ह्यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
नुकतच या सिनेमातील मोनालिसा बागल आणि तानाजी जलगुंडेचा लूक समोर आला असून तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय पांढ-या रंगाचा शर्टे आणि पांढ-या रंगाची पँन्ट, डोळेवर काळा चष्मा आणि धमाल केसांची हेअर स्टाईल, गळ्यात सोळ्याची मोठी चैन, हातात घड्याळ जणू काय गावाताला पाटिलच आहे. आणि त्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल सारखी देखिल आहे. झल्ला बोभाटा, सौ. शशि देवधर सारखे अनेक सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप टाकली. मात्र या सिनेमाती मोनालिसा एक सोजव्वळ सुंदरी टिपिकल साउथ इंडियन लूकमध्ये झळकणार आहे. त्यामूळे जशी ही धमाल जोडी आहे तसच कमाल कॅबिनेशन यांच या लूकमधून पाहिला मिळतयं त्यामूळे आता सिनेमाच्या नावाची आणि त्यांच्या कथा काय असेल याकडे सगळ्याच लक्ष लागल आहे