IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ठरली अव्वल !
बॉलिवूड च्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ताम्हणकर !
मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडिया वर आली असून IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे.
बॉलिवुडच्या बड्या प्रोजेक्ट्स मध्ये सई वारंवार दिसत असताना आता IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये तिने बॉलिवुड स्टार्स सोबत अव्वल स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवुड मध्ये तिच्या कामाच्या चर्चा तर आहेच पण IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई १० व्या क्रमांकावर आहे.
बॉलिवुड मधल्या अनेक बड्या स्टार्स ना मागे टाकत सई IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. सईच्या कामाचं सातत्य आणि बॉलिवुड मध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामाच्या चर्चा कायम बघायला मिळतात.
येणाऱ्या काळात सई बॉलिवुडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स तर करणार असून क्राईम बीट, डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग सारख्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.