निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला महाकुंभ मेळ्यात !
महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान !
महाकुंभ मेळ्यात स्नान करणं हा दैवी आशीर्वाद - स्वप्नील जोशी
प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय आणि जगभरातील भक्तांनी या महा कुंभ मेळ्यात खास हजेरी देखील लावली आहे.
हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो.
स्वप्नील ने त्याचा सोशल मीडिया वरून या महाकुंभ मेळ्याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नील ने खास स्नान तर केलं पण भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या खास सोहळ्याची झलक त्याने या व्हिडिओ मधून दाखवली आहे.
https://www.instagram.com/share/BAJTJZ_aPs
स्वप्नील हा खास अनुभव शेयर करत म्हणतो "२०२५ मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महा कुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले. या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो"
स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे !