Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*एजेच्या प्रोपोजलसाठी लीला करणार उपोषण !*

*एजेच्या प्रोपोजलसाठी लीला करणार उपोषण !*



*'नवरी मिळे हिटलरला'* मालिकेत लीला, एजेने तिला प्रपोज करावं म्हणून उपोषणाला बसणार आहे. त्यात तिला साथ मिळणार आहे ती म्हणजे सरोजिनीची. एजे लीलाने केलेलं उपोषण मोडण्यासाठी लीलाचा आवडता नाष्टा ही बनवतोय. पण काही केल्या लीला उपोषण सोडत नाही. सूना लीला वर बारीक लक्ष ठेवून आहेत. 



शेवटी एजे स्वतः उपाशी राहण्याचा निश्चय करतो, आता मात्र लीलाचा नाईलाज होतो. पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. ती एजेला म्हणते मला प्रपोज करावंच लागेल. पण एजेच्या मनात खंत आहे की जी गोष्ट अंतरा सोबत झाली ती लीलासोबत होऊ नये, म्हणून तो अंतराच्या फोटो जवळ जाऊन त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो की जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दुरावली आहे.  



लीलाला त्याला गमवायचं नाहीये. पण लीलाचा हट्ट म्हणून एजे फायनली तिला विचारतो नक्की तुला कसं प्रपोजल हवं आहे. तेव्हा लीला त्याला एकदम फिल्मी स्टाईल ग्रँड प्रपोजलच्या करून दाखवा असं सांगते. त्याच दरम्यान किशोर लीलाला जीवे मारण्याचा प्लॅन बनवतोय, त्यासाठी तो एजे आणि लीलाच्या मागे माणसं पाठवतो. 


*आता एजे फिल्मी स्टाईल प्रपोज करू शकेल, की खरंच एजेच्या मनातील भीती खरी ठरेल ? यासाठी पहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.