Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा*

 *वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा, मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा*

 


पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 


*मुंबई ७ फेब्रुवारी,२०२५ :* कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं संपायचं नावंच घेत नाही.अशात तिला साथ देत आहेत तिच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स.मनोजला आपलंस करण्यासाठी सुमन अनेक प्रयत्न करते आहे,घाट घालते आहे. पण,मनोजचं मात्र वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे.एकीकडे सुमन कशी  मनोजसाठी योग्य आहे हे मनोजची आई  त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे मनोज मात्र आपल्या मतावर ठाम आहे त्याला सुमन बरोबर कोणतंही नातं जपण्यात रस नाहीये. पण, इंदू सुमनचं मन बदलण्यात यशस्वी होते. मनोजसमोर त्याच्या आईचे सत्य येते आणि तो आईला वल्लरीची माफी मागायला सांगते.



 मनोज आणि सुमन मुंबईला पिंगा गर्ल्सच्या घरी येतात. सुमन आणि मनोजला असं एकत्र आलेलं बघून पिंगा गर्ल्स जरा शॉकच होतात. त्यात सगळ्यांची सुमन कुठे राहणार यावरून चर्चा सुरु होते. सुमन अनेक छोटया मोठ्या गोष्टी करत असताना मालिकेत दिसून येत आहे.जसं मनोजचा उष्टा चहा पिणे, वल्लरीच्या हातावर गरम वरण सांडवणे हे बघून पिंगा गर्ल्सना राग येतो. सुमनचा डाव नक्की काय आहे हे पिंगा गर्ल्सना कळले आहे. वल्लरीच्या संसारात सुमन मिठाचा खडा टाकत आहे हे पिंगा गर्ल्सना कळून चुकले आहे. प्रत्येक क्षणी सुमन वल्लरी आणि मनोजच्या मध्ये येते आहे हे बघून पिंगा गर्ल्स सुमनला धडा शिकवायचं ठरवतात. आता नक्की त्या काय करणार ? कसा सुमनला धडा शिकवणार ? हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे. हे जाणून घेण्यासाठी पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.  



एकीकडे पिंगा गर्ल्स वल्लरी आणि मनोजला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे सगळ्या मिळून प्रेरणाला देखील सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या आयुष्यात देखील बऱ्याच अडचणी सुरु आहेत आणि त्यातून तिला पाठींब्या देण्यासाठी सगळ्याजणी मिळून पथनाट्य सादर करतात आणि प्रेरणाचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. वल्लरी प्रेरणाच्या आईशी बोलून त्यांना त्यांचे वागणे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. आता बघूया प्रेरणाला या परिस्थितून पिंगा गर्ल्स बाहेर काढण्यासाठी काय आणि कशी मदत करतील. तर मनोजसोबत मुंबईमध्ये आलेल्या सुमनला कसा धडा शिकवून तिची रवानगी कशी गावी करतील हे बघणे रंजक असणार आहे. हे सगळे जाणून घेण्यासाठी पहा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या. ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.