*रंजक ट्विस्टमधून उलगडणार ‘म्हणजे वाघाचे पंजे’ची आकर्षक कहाणी*
*त्रिशुलीन सिनेव्हिजन प्रस्तुत व स्वरूप सावंत दिग्दर्शित ‘म्हणजे वाघाचे पंजे’ चित्रपटाची घोषणा, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस*
*’म्हणजे वाघाचे पंजे’ चित्रपटातून तमन्ना बांदेकरचं सिनेविश्वात पदार्पण, सौरभ गोखलेसह करणार स्क्रीन शेअर*
सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत. मराठी सिनेसृष्टीत आशयघन विषय असलेल्या चित्रपटांची तर लाट आली आहे. अशातच रोमँटिक आणि आशयघन विषयाची जोड असलेला ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. दमदार स्टारकास्ट आणि कथेत ट्विस्ट असणारा हा नवा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे. चित्रपटातील कलाकार एका वेगळ्याच विषयाला हाताळत कोणता संदेश देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
त्रिशुलीन सिनेव्हिजन प्रस्तुत ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण अनेकांच्या पसंतीस पडेल यांत शंका नाही. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरूप सावंत याने उत्तमरित्या पेलवली आहे. दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे आहे. तसेच लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाची तगडी स्टारकास्ट लक्षवेधी ठरेल. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या नव्याकोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.