*"मी पहिल्यांदा अवॉर्ड समारंभात सहभागी झाले."- प्राप्ती रेडकर*
*"या मालिकेमुळे एक नायिका म्हणून मी प्रसिद्ध झाले" - दिशा परदेशी*
'सावळ्याची जणू सावली' मधली प्रेक्षकांची लाडकी सावली म्हणजेच *प्राप्ती रेडकर* म्हणाली - "२०२४ मधली माझी आवडती आठवण आहे झी मराठी अवॉर्ड्स २०२४ मध्ये मी परफॉर्मस दिला. मी पहिल्यांदा अवॉर्ड इव्हेंट मध्ये सहभागी झाले होते. या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका मिळणं माझ्यासाठी अचिव्हमेंट पेक्षा कमी नव्हतं. २०२४ची गोष्ट, जी अजून छान करता आली असती ती म्हणजे वेळ फुकट न घालवणे. मी खूप आळशी आहे. एकतर मी शूट मध्ये व्यस्त असते आणि एखादी सुट्टी जर मिळाली तर मी दिवसभर झोपून काढते किंवा फोनवर असते. मी कोणाला भेटत नाही, जी कामं करायची आहेत ती राहून जातात आणि माझ्यासोबत असं भरपूर झाले आहे. या वर्षी ही सवय मला सुधारायची आहे. माझी खूप इच्छा होती की मी किक बॉक्सिंगच्या चॅम्पियनशिप मध्ये खेळें. मला २०२४ मध्ये नॅशनलसाठी पुन्हा खेळायचं होत पण ते राहून गेलं. माझ्यासाठी ऍक्टिंग आणि मार्शिअल आर्टसाठी एकत्र वेळ काढून ते जमवून आणण थोडं कठीण जात आहे पण मी नक्की प्रयत्न करत आहे."
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील तुळजा *दिशा परदेशी* म्हणते, - "२०२४ ची माझी बेस्ट कामगिरी म्हणजे मला 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाची भूमिका साकारायला मिळणं, ते ही झी मराठी सारख्या मोठ्या वाहिनीवर. या मालिकेमुळे एक नायिका म्हणून मी प्रसिद्ध झाली, घरा-घरात पोहचले. त्यासोबत माझी पहिली फिल्म मी स्कॉटलंड मध्ये शूट केली तीही २०२४ मध्ये रिलिज झाली. पहिली फिल्म रिलिज झाली आणि मला माझं पाहिलं अवॉर्ड मिळालं फ्रेशफेस ऑफ २०२४. २०२४ मध्ये इतकी छान कामं मिळाली आहेत तर मला माझा अभिमान ही वाटतो."