*साऊथ एक्सक्लूझिव्ह सिरीज 'सीन' पहिल्यांदा अल्ट्रा झकास मराठी आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर ...*
मुंबई 30 डिसेंबर 2024 : साऊथ डब सिरीजच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे साऊथमधील तेलगु भाषेतील सिरीज 'Sin' आता अल्ट्रा झकास मराठी आणि अल्ट्रा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. अत्याचार, अन्याय आणि त्यावर मिळवलेल्या विजयाची कथा सांगणारी ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हि सिरीज खास जगभरातील हिंदी आणि मराठी प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार आहे.
‘सीन’ म्हणजेच मराठीत 'पाप' ही सिरीज एका स्त्रीच्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. हि कहाणी अपमानास्पद विवाह आणि पतीच्या अनैतिक संबंधांमुळे भावनिक संघर्षात अडकलेल्या एका स्त्रीची आहे. जिचे पतीच्या वासने आणि विश्वासघातामुळे प्रेम संघर्ष करत असते. पण काय ती स्वता:चा हरवलेला सन्मान परत मिळवू शकेल? कि घरच्या नातेसंबंधांच्या जाळयात अडकून राहिल?
'पाप' हि सिरीज प्रेक्षकांना एक नविन आणि भावनिक अनुभव देईल. या सिरीजच्या माध्यमातून एक स्त्री आपल्या जीवनात येणाऱ्या विविध संकटांचा कसा सामना करते, हे दर्शवले जाते. या सिरीजमध्ये, एक स्त्री केवळ प्रेम आणि विश्वासघात यांचे अनुभव घेते, तर त्यातून एक नवीन दृष्टीकोन मिळवून तिचे आयुष्य बदलवते. या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्त्रिया आपल्या जीवनाच्या वळणावर त्यांचा मार्ग स्वतः ठरवू शकतात आणि त्यात धैर्य आणि समर्पण असावे लागते याची शिकवण मिळेल.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "या सिरीजला अल्ट्रा झकास मराठी आणि अल्ट्रा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करताना खूप आनंदित आहोत. या सिरीजमध्ये समाजातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांचा सामना केला जातो. आम्ही महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या संघर्षाची एक प्रेरणादायक कथा प्रेक्षकांना दाखवू इच्छितो, ज्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपली ओळख आणि आदर मिळवण्याची प्रेरणा मिळेल. यासोबतच ३०००+ तासांचा मराठी कंटेंट अल्ट्रा झकास ओटीटीवर उपलब्ध आहे, जो केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून तुम्ही मनसोक्त पाहू शकता."