Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" हिरा फेरी " चा ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा सोहळा संपन्न


*अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या “हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा संपन्न !!*


अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या 'ढ लेकाचा’, 'अदृश्य', 'बोल हरी बोल' या आणि इतर सुपरहिट चित्रपटांनंतर आता "हिरा फेरी" हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजीटल प्रिमियर होणाऱ्या “हिरा फेरी” या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला असून यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अल्ट्रा मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO श्री.सुशीलकुमार अग्रवाल, अल्ट्रा मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्केटिंग हेड ब्रिंदा अग्रवाल, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे बिजनेस हेड श्री.वेंकट गारापाटी, चित्रपटाचे दिग्दर्शक श्री.अमोल बिडकर आणि कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक श्री.काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार उपस्थित होते.




"हिरा फेरी" चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार असून चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने, म्हणजेच निर्मिती सावंत यांचे सुपुत्र अभिनय सावंतने, आपली बायको अनूसोबत एका चोराला आपल्या जाळ्यात अडकवून, त्याचा बहुमोल हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असताना, तिथे बायकोचा बाप, चोराचा बॉस, मांत्रिक, पत्रकार आणि पोलिसांचा मिलाप होऊन त्या हिऱ्यासाठी घोडदौड सुरू होते आणि हिरा फेरीत हिरा कोणाकडे फिरेल हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. नेमका हिरा कोणाकडे जाईल याची धम्माल विनोदी मजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.




यावेळी चित्रपटाचे निर्माते श्री. सुशीलकुमार अग्रवाल "हिरा फेरी" चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले "प्रेक्षकांच्या वाढत्या दर्जेदार मनोरंजनाच्या मागणीचा मागोवा घेत आम्ही "अल्ट्रा झकास" हा एकमेव दर्जेदार आणि अखंड मनोरंजन देणारं ओटीटी माध्यम लाँच केलं आणि त्या अनुषंगाने प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करत बक्कळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आम्ही  "हिरा फेरी" हा लोटपोट हसवणारा विनोदी चित्रपट तुम्हा प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. “हिरा फेरी” सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच भावेल आणि प्रचंड आवडेल याची खात्री आहे. 'ढ लेकाचा', ‘अदृश्य',  ‘बोल हरी बोल’ आणि अल्ट्रा झकासच्या इतर चित्रपटांप्रमाणे "हिरा फेरी"लाही सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी आशा आहे."



*अल्ट्रा झकास सोशल मीडिया हॅण्डल्स*

https://www.youtube.com/@ultrajhakaas

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas/

https://twitter.com/ultrajhakaas


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.