Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रहस्यमयी अन् उत्कंठा वाढवणारा , " थकाबाई " लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 *सावधान.... थकाबाई येत आहे!*


*‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च* 



रसहस्यमयी आणि गूढ चित्रपटांना मराठी प्रेक्षक कायमच पसंती देतात. असाच एक रहस्यमयी चित्रपट नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे घेऊन येत आहेत. ‘थकाबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून या नावातच रहस्य आहे. या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च नुकतेच बांद्र्याच्या शॉ किया या शोरूममध्ये पार पडले. शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील.



‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी त्यावर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह या पोस्टरवर दिसतोय. तर हेमल इंगळे रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय अशी मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य थकाबाई: जाणे रहस्य’ या नावामुळे नक्की चित्रपटात काय असेल, थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 



सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च प्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा,उमेश घळसासी, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.