प्रचिती आणि परिक्रमेची एकत्रित अनुभूती…!
कोकणात चित्रीकरण होत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ या मालिकेतील एका प्रसंगासाठी मालिकेची टीम एका दिवसासाठी सावंतवाडी येथील वेत्ते गावी गेली होती. चित्रीकरणादरम्यान श्री देव वेतोबाच्या मूळ वेशातील रूप चित्रित करून संपूर्ण युनिट पुन्हा कोकणात मूळ सेटवर परतले. तेव्हा सर्व सामान जागच्याजागी ठेवत असताना वेतोबाची काठी सापडत नसून रात्रीचा अंधार, आऊटडोर शूट आणि कोकणातील पाऊसमुळे, काठी वेत्ते गावीच राहिल्याचे काही प्रोडक्शन वाल्यांच्या लक्षात आले.
खूप पाऊस असल्याकारणास्तव दुसऱ्या दिवशी नेहमीच्या जागी चित्रीकरण सुरू करण्याआधी त्यांनी वेत्ते गाव गाठले. तेथे पोहोचताच ते अचंबित झाले. तीच काठी.. त्याच जागी…जशीच्या तशी… परंतू पूजलेली. गावकऱ्यांनी वेतोबा महाराजांची काठी…वेतोबा महाराज इथे येऊन गेले… या श्रद्धेने मनोभावे आत्मीयता वर्तवली. गावकऱ्यांचे इतके प्रेम, श्रद्धा, मालिके वरील आणि निर्मात्यांवरील विश्वास आणि आशीर्वाद पाहता क्षेत्रपाल श्री देव वेतोबानेच त्याची परिक्रमाही पूर्ण करून घेतल्याचा भास होतो.