Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 22 सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सज्ज

 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 22 सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सज्ज


* विशेष संवाददाता -- दिलीप रामचंद्र यादव 

--------------------------


 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राज्यांमध्ये एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार

भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय योगदानासाठी अनंत नाग यांना 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार

सर्वोत्कृष्ट चित्रपट ते सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीपर्यंत, सर्वोत्कृष्ट चित्रपटीय कामगिरी केंद्रस्थानी असणार


मंच सज्ज आहे, प्रकाशयोजना तयार आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींवर प्रकाशझोत पडणार आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधल्या केवडिया इथल्या एकता नगर इथे होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची जोरदार तयारी सुरू आहे. 2024 या वर्षातल्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करतील.




दादासाहेब फाळके पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती 22 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवणार आहेत.

5 दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अनंत नाग यांनी विविध कलाकृतींद्वारे कन्नड आणि भारतीय चित्रपटसृष्टीत चिरंतन योगदान दिले आहे. हा सन्मान त्यांचा उल्लेखनीय कलात्मक प्रवास आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशातल्या त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करतो.


भारतीय सर्वोत्कृष्ट कामगिरीचा उत्सव


72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशभरातले सर्वोत्तम चित्रपट, सादरीकरणे आणि सर्जनशील प्रतिभा एकत्र आणतील.


'आर्टिकल 370' ला सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर 'भंगार' ला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट आणि 'राम-नामी' ला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून निवडण्यात आले आहे.


अभिनय श्रेणीमध्ये, ‘ब्रह्मयुगम’ चित्रपटासाठी अभिनेते मामूटी यांची तर,  ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी अभिनेते कार्तिक आर्यन यांची ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (मुख्य भूमिका) म्हणून निवड करण्यात आली आहे तर, 'आर्टिकल 370' चित्रपटासाठी यामी गौतम यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' (मुख्य भूमिका) हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांची 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधता आणि संपन्नता  दर्शवणाऱ्या विविध श्रेणींमध्ये इतर अनेक चित्रपट आणि कलाकारांचाही गौरव करण्यात येणार आहे.


'कल्की 2898 एडी', 'अमरन', 'पुष्पा: द रूल पार्ट-02', 'भूल भुलैया 3' आणि 'स्त्री 2' यांसारख्या चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.