Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला

 गोव्याच्या सफरीला साऊथचा तडका!

मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला



‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटाने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांना गोव्याच्या धमाल सफरीची झलक दाखवली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक भन्नाट प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या हटके साऊथ इंडियन स्टाईलमुळे हे गाणं विशेष चर्चेत आलं आहे.


‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि धमाल व्हाइब अनुभवायला मिळतात. गाण्याची ऊर्जा, आकर्षक सादरीकरण आणि मनोरंजक कोरिओग्राफीमुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे आहे. गोव्याच्या धमाल वातावरणात साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि भन्नाट प्रवासाची आणखी एक झलक दाखवते.


मराठी चित्रपटात साऊथ इंडियन स्टाईलचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, सोशल मीडियावरही या गाण्याची चांगली चर्चा सुरू आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते व राहुल देशपांडे यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तसेच अवधूत गुप्ते यांनीच या गाण्याचे शब्द लिहले असून त्यांचेच संगीत या गाण्याला लाभले आहे. त्यांच्या संगीताने या गाण्याला एक वेगळीच उर्जा मिळाली आहे.


या गाण्याबद्दल दिग्दर्शक विजू माने म्हणाले, ‘‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट जसा मनोरंजनाचा धमाल प्रवास आहे, तसंच त्यातील प्रत्येक गाणंही वेगळा अनुभव देणारं आहे. ‘वणक्कम’ हे गाणं करताना आम्ही साऊथ इंडियन संगीताचा उत्साह, त्यांची ऊर्जा आणि सेलिब्रेशनची भावना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे गाणं अत्यंत एंटरटेनिंग आहे आणि चित्रपटात एक वेगळीच रंगत आणतं. विशेष म्हणजे, हे गाणं आम्ही सुपरस्टार रजनीकांत यांना समर्पित करत आहोत. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे.’’



'विजुमेनिया प्रा. लि.' आणि 'लाईट अँड शेड' प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. ३१ जुलैला हा मैत्रीचा भन्नाट अनुभव घेऊन हा चित्रपट तुमच्या भेटीला चित्रपटगृहात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.