Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूकने चर्चांना उधाण !

 ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूकने चर्चांना उधाण !


ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूकची चर्चा ! नवीन फिल्म, गाणं की अजून काही .....




संगीत विश्वात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे गायक अभिजीत सावंत ! इंडियन आयडॉल विजेता  ते अगदी बिग बॉस मराठी मधून त्याने कायम प्रेक्षकांची मन जिंकली पण सध्या तो एका खास कारणाने चर्चेत आहे. संगीत विश्वात नावीन्यपूर्ण प्रयोगशील गाणी करून  आणि ट्रेंड सेटर गायक म्हणून त्याची ओळख तो कायम जपत आला आहे.


नुकताच अभिजीत ने सोशल मीडिया वर एक व्हिडिओ पोस्ट केला यात तो एकदम हँडसम स्मार्ट लूक मध्ये बघायला मिळतोय तर एकीकडे फॅन्सने त्याचा या व्हिडिओ वर भन्नाट कॉमेंट्स देखील केल्या आहेत. अभिजीत हा कायम सोशल मीडिया वर सक्रिय असून तो त्याचा नवनवीन प्रोजेक्ट बद्दल गाण्याबद्दल अपडेट देत असतो पण हा नवा लूक नक्की कशासाठी ? हा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे. 



या नव्या लूक बद्दल सध्या चर्चांना उधाण आलं असून आता अभिजीत नवीन गाणं करतोय का ? नवा चित्रपट करणार का की एखादा ओटीटी प्रोजेक्ट साठी त्याने हा नवा कोरा लूक केला आहे हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे तर या बद्दल अभिजीत लवकरच प्रेक्षकांना काहीतरी नवीन सरप्राईज देणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.


सुमधुर आवाजाने आजवर तो कायम प्रेक्षकांना मोहित करत असतो अश्यातच काही दिवसांपूर्वी अभिजीत गौतमी पाटील सोबत एका गाण्यात दिसला होता आता आगामी काळात तो अजून कोणत्या नव्या अभिनेत्री सोबत दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.