Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड कायम!*

 *जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड कायम!*

*मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पहिल्या आठवड्याची कमाई ₹५७.७० कोटी नेट्ट*


जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी ओपनिंग नोंदवल्यानंतर आता पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा मानही पटकावला आहे. चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत ₹५० कोटींचा टप्पा सहज पार करत ₹५७.७० कोटी नेट्ट अशी भक्कम कमाई केली आहे.



*बॉक्स ऑफिस कलेक्शन (भारत):*

*दिवस १ (शुक्रवार): ₹१२.४० कोटी*

*दिवस २ (शनिवार): ₹११.५० कोटी*

*दिवस ३ (रविवार): ₹१३.१० कोटी*

*दिवस ४ (सोमवार): ₹६.२० कोटी*

*दिवस ५ (मंगळवार): ₹५.४० कोटी*

*दिवस ६ (बुधवार): ₹४.७० कोटी*

*दिवस ७ (गुरुवार): ₹४.४० कोटी*

*एकूण: ₹५७.७० कोटी नेट्ट*


प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आणि तोंडी प्रसिद्धीमुळे *‘राजा शिवाजी’*ची बॉक्स ऑफिसवरील विजयी घोडदौड पुढील आठवड्यांतही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.